तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

By | January 7, 2018

prakash ambedkar makes controversy on democracy in india

शांततेच्या मार्गाने जगणाऱ्या माणसाने लोकशाहीच मानली पाहिजे, असे नाही. जगणाऱ्या माणसाने हिंसा हा त्याचा मार्ग असता कामा नये. आणि हिंसेपासून प्रवृत्त करणे, हे आमचे कार्य म्हणून आम्ही समजतो. हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणाऱ्यांनाही सोबत घ्यायला तयार आहोत.लोकशाहीला सगळ्यांनी मानले पाहिजे असे नाही, असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

कोरेगाव भीमा मधील आरोपींवर कारवाई झाली नाही तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद जन्माला येतील असे देखील ते बोलले . जिग्नेशच्या सभेनंतर भीमा-कोरेगावला झालेला दुर्दैवी प्रकार, महाराष्ट्र बंद आणि त्यानंतर उमटलेल्या हिंसक प्रतिक्रिया, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या अटकेची मागणी या संदर्भात ते एबीपी माझा या वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. भिडे व एकबोटेंवर बोट दाखवण्यासाठीचा तुमची काही तपास यंत्रणा आहे का ? ह्या प्रश्नावर मात्र ते टोलवा टोलवी करताना दिसले. माध्यमांना देखील हा हिंसाचार मराठा विरूद्ध दलित असा रंगविला व नंतर जिग्नेश व उमरचे नाव घेण्यात आले असेही ते म्हणाले. तसेच कोरेगाव हिंसा टी.व्ही. वर का दाखवली नाही असा उलट प्रश्न त्यांनी मुलाखत कर्त्यांना विचारला, यावर जबाबदारीचे भान ठेवून आम्ही हे दाखवले नाही असे देखील मुलाखतकर्त्याने सांगितले.

अफजल गुरु व बुऱ्हाण वाणीचे समर्थन करण्यापलीकडे कुठलिही ओळख नसलेला उमर खालिद यास निमंत्रण तरी का दिले ? असा प्रश्न विचारला असतं त्यांनी तो चेंडू एल्गार परिषदेच्या बाजूला लोटून दिला. उमर खालेद का आणण्यास तुम्ही विरोध का केला नाही ? ह्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खलिस्तान म्हणणाऱ्या एका जनाला न्यायालयाने वेडसर समजून सोडून दिले होते याचे उदाहरण दिले मात्र मग असेच काहीसे बोलणाऱ्या उमर खालेदला तरी का बोलावले यावर तुम्ही कोण ठरवणारे ? असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकाराला विचारले ? (ही पूर्ण मुलाखत इथे पाहता येईल https://www.youtube.com/watch?v=B6aAUX4sYhw)

उमर खालेद या एल्गार परिषदेतील सहभागाचं त्यांनी जोरदार समर्थन करतानाच भिडे व एकबोटे यांच्या अटकेची मागणी लावून धरली. दलित मराठा संघर्ष पेटवण्याचा प्रयन्त होत असल्याचे ते म्हणाले. मात्र हिंसा सोडल्यास लोकशाही न मानणाऱ्यांनाही सोबत घेऊ असेही ते बोलले. कोरेगाव च्या घटने नंतर महाराष्ट्रात झालेला हिंसाचार तुम्हाला दिसतो मात्र कोरेगाव मधील झालेला हिंसाचार तुम्हाला दिसत नाही असे देखील ते म्हणाले.

  • तपास यंत्रणाचा काय आहे अंदाज

भीमा कोरेगावच्या झालेल्या प्रकारात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झालेल्या हिंसाचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.दलित विरुद्ध दलितेतर हा वाद उफाळून आणून संपूर्ण महाराष्ट्र धुमसत ठेवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता . नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर याआधी आलेली आहे. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने वृत्त दिले आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचं लोण पसरावं, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटलं जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक झाली होती, त्यातील काही सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे.

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालेद यांनी भाषण केलेल्या एल्गार परिषदेमध्ये सहभागी लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच प्रकाश आंबेडकर आणि लोकशाहीच्या विरोधात वक्तव्य केल्याने त्यांना देखील लोकशाही नको आहे का काय ? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

.. तर हिंदूंच्या घरात देखील हाफिज सईद जन्माला येईल: प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा