भिडे आणि एकबोटे यांच्याविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा

By | January 3, 2018

prakash ambedkar blames hindu organisations over violence in maharashtra

आजचा महाराष्ट्रात पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असला तरी आज पुकारण्यात आलेला बंद हा शांततेत पार पडला नाही. सकाळ पासूनच लहान मोठ्या घटनांनी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. पोलीस यंत्रणेसाठी देखील आजचा दिवस हा परीक्षेचाच दिवस होता म्हटले तरी चालेल. काही ठिकाणी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली.

संध्याकाळी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. काल  प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद शांततेत पार पडला जावा असे आवाहन केले होते मात्र दिवसभर झालेल्या राड्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरले. त्याचबरोबर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे भारतीय दंडविधानाच्या कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी त्यांनी केली

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले , सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनला फाशीची शिक्षा देताना असे म्हटले होते की याकूब मेमन बॉम्बस्फोट झाले तिथे हजर नव्हता. मात्र या कटात तो सहभागी होता. त्याला बॉम्बस्फोट होणार हे माहिती होते. त्यामुळे त्याला फाशी देण्यात येत आहे. तोच न्याय इथे भिडे व एकबोटे यांना लावावा . भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत, त्यांना अटक करण्यात यावी.

महाराष्ट्रातील ५० टक्के जनता बंद मध्ये सहभागी असल्याचा त्यांनी दावा केला. तसेच बंद शांततेत पार पडला असे देखील ते म्हणाले. ह्या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. दोन-तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला, काही जण विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि जिग्नेश मेवानी यांची नावे घेतली जात आहेत, पण त्यांचा याच्याशी संबंध नाही. जोपर्यंत माझ्या हातात होते तोपर्यंत मी आंदोलन शांत ठेवण्याचे काम केले असेही ते पुढे म्हणाले.

बंद मागे घेण्यात आलेला असला तरी बंद शांततेत बिलकुल पार पडला नाही . मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने झाली. कल्याण इथे शिवसेनेच्या शाखेवर हल्ला करण्यात आला तर परभणी इथे संघाच्या कार्यालयावर पेट्रोलची बाटली फेकण्यात आली. नाशिकमध्ये शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली. कुडाळमध्ये देखील रास्त रोको करण्यात आले. लातूरमधील निलंगा इथे कलाम १४४ लागू करावे लागले.

आपल्यावरील आरोपांबद्दल मिलिंद एकबोटे काय म्हणतात ? : कोरेगाव भीमा प्रकरण

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा