हिंदूंमधील हाफिज सईद याचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा ? : काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

By | January 13, 2018

prakash ambedkar says hafiz saeed will be born in hindu house

हिंदूंमधील हाफिज सईद याचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा जनतेला त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन करण्याची वेळ येईल, अशी भूमिका आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर इथे मांडली. कोल्हापूर इथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या प्रमाणे हाफीज सईदवर जशी पाकिस्तानमध्ये कारवाई होत नाही, तसेच संभाजी भिडे यांच्यावरही कारवाई होत नाही, असेहि ते म्हणाले.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, अनियंत्रित हिंदू संघटना देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत . महाराष्ट्राला दुसऱ्यांदा आम्ही जातीय दंगलींपासून वाचवले. माझ्याबरोबर काम करणाऱ्यांनी जनतेला समजावून सांगितले. भारताचा पाकिस्तान होऊ नये, इतके सरकारने पाहावे. हाफीज सईद जसा पाकिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेऊ पाहत आहे, तसे भारतात होऊ नये . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हिंदुत्त्ववाद्यांकडून धोका आहेच . पोलिस खाते देशाशी प्रामाणिक नाही. त्यांच्यातीलच अनेक अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. न्यायाधीशांनी जसे काल बोलून दाखविले, तसेच पोलिसांनीही करावे.

  • संबधित बातम्या

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

देवेंद्र फडवणीस यांच्याशी बोलल्यानंतरही ‘ पोलीस कार्यकर्त्यांवर चुकीची कारवाई करत आहेत. दलित संघटनांचा मी काल, आज आणि उद्याही ‘राजा’ असेन.. माझ्यापुढे इतर सगळे कागदी वाघ आहेत’ असा टोलाही अप्रत्यक्ष पणे रामदास आठवले यांना लगावला. कोरेगाव भीमा प्रकरणास शासनच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. याआधी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी जिग्नेश मेवाणी ह्याचे राजकारण बालिशपणाचे असल्याचे म्हटले होते तसेच झिरो असलेल्या जिग्नेशला माझ्यासारख्या ३००० लोकांनी निवडून आणले असे देखील ते बोलले होते .

दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणाने राज्य ढवळून निघत असताना आंबेडकरी समूहात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. दंगलप्रकरणी सुरु झालेल्या आंदोलनाने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळाला. आठवले याचे समर्थन काही प्रमाणात कमी झाले असे चित्र निर्माण झाले होते मात्र आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते फोडून दाखवले आहेत.

कालच कसारा येथील भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी सुहास जगताप यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह रामदास आठवले यांच्या संविधान ह्या निवासस्थानी भेट घेऊन रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आठवले गटाकडून एक प्रसिद्धीपत्रक देण्यात आले त्यात, महाराष्ट्र बंद’प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांचे नाव पुढे आले असले तरी या प्रकरणात त्यांची भूमिका पटणारी नसल्याचे सांगत कसारा येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जात असल्याचे जाहीर केले आहे . रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका असल्याचे देखील या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .

  • संबधित बातम्या

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा