नावे जाहीर न करता कोरेगाव हिंसा प्रकरणी १२ जण धरले : कारवाईला सुरुवात

By | January 9, 2018

police takes action against youth in koregaon bhima violence

कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या आठवड्याभरानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून तब्बल १२ जनास अटक करण्यात आली आहे . त्यातील ९ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली असून ३ जण अल्पवयीन असल्याचे समजते.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी परिसरातील आहेत. अर्थात हे आरोपी दोन्हीही गटातील असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे . प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने आरोपींची नावे जाहीर करण्यात न आल्याचे अत्यंत स्वागतपर असे पाऊल पोलिसांकडून उचलन्यात आलेले आहे. अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. लवकरच ह्या प्रश्नांच्या उत्तरांची महाराष्ट्राला अपेक्षा आहे. ही उत्तरे आता लवकरात लवकर मिळतील अशी आशा करूयात .

इतर प्रकरणामध्ये देखील अशाच पद्धतीने नावे जाहीर न करता पोलिसांनी काम करत राहावे अशी अपेक्षा आहे . नवे जाहीर केल्याने जातीयवादाचे भांडवल करणाऱ्या लोकाच्या हाती समाजात आग पेटवायला आयते कोलीत मिळते. अशा पद्धतीने त्यांना संधीच मिळणार नाही त्यामुळे हे योग्य पाऊल असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे. काही प्रमाणात सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत असून जे दोषी आढळतील त्यांना अटक करण्यात येणार आहे.

  1. संबधित बातम्या

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद तयार झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीमध्ये होऊन त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड,जाळपोळ करण्यात आली तसेच परिसरात दगडफेक देखील करण्यात आली. राज्य राखीव दलाच्या एका तुकडीवर देखील एका समुदायाकडून हल्ला करण्यात आला. ह्या हिंसाचारामध्ये एका युवकाला प्राण देखील गमवावा लागला होता .

या पूर्वीच पोलिसांनी वढू बुद्रुक येथून १५ जणांना ताब्यात घेतले असून आतपर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा हत्येत सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हल्लेखोर कोणत्याही समाजाचे असोत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे तरच अशा घटनांना पुढे आळा असेल, असे सर्वच समाजाच्या नागरिकांकडून बोलले जात आहे. नावे जाहीर न करून देखील कारवाईला जातीय स्वरूप देण्याचे हत्यार पोलिसांनी जातीयवाद्यांच्या हातून काढून घेतले आहे असे म्हणावे लागेल.

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा