अवैध सावकारीचा ना पर्दाफाश ? ना तपासात प्रगती ? फक्त धूळफेक : बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण

By | May 20, 2018

private finance suicide case balasaheb pawar ahmednagar

नगर येथील ओम उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पवार याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांच्या घरी पोलिसांनी आणि सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पवार व सावकार यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले आहे . मात्र अद्याप देखील पोलीस बाळासाहेब पवार याच्या सुसाईड नोट मधील सगळी नावे जाहीर करण्याची हिंमत दाखवू शकलेले नाही , त्यामुळे हे फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक सुरु आहे का ? ,पोलीस कोणाला कव्हर करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे .

नगर शहरात काही नेत्यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अवैध सावकारी रॅकेटनेच ओम उद्योग समूहाचे बाळासाहेब पवार यांचा बळी घेतला आहे . पवारांना व्याजाने पैसे देण्याऱ्या एकाही जणाकडे सावकारीचा परवाना नाही . अवैध सावकारशाहीच्या या व्यवसायात पतसंस्था, क्रिकेट बेटिंग आणि नेत्यांचे पैसे असल्याचे देखील समोर येत आहे .मात्र तपासात प्रगती होण्यापेक्षा अधिकारी बदलणे आणि नुसती छापेमारी इथवरच पोलिसांचा तपास सुरु आहे . सुसाईड नोट मधील मजकूर अद्याप देखील गुलदस्त्यातच आहे.

  • प्रकरण काय आणि पोलिसांची भूमिका का संशयास्पद ?

व्याजाच्या पैशासाठी सावकारांनी छळल्याने नगर येथील व्यवसायिक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च २०१८ रोजी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी पवार यांच्या मुलीने फिर्याद दाखल केल्यानंतर नवनाथ वाघ, यशवंत कदम, विनायक रणसिंग व कटारिया जीजी ह्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीस पकडण्यात (नवनाथ वाघ ) पोलिसाना यश आले आहे . त्याच्याकडून देखील कोणती माहिती उघड झालेली नाही. आता त्याला जामीन मिळालेला असून इतर ३ जणांना देखील अटकपूर्व जामीन मिळालेला आहे . सध्या ह्या प्रकारांची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी हे करत आहेत . चार दिवसांपूर्वी सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. त्यात पवार यांच्याशी झालेल्या व्यवहारांचे स्टॅम्प पेपर, पवार यांनी केलेल्या आरटीजीसच्या पावत्या व खरेदीखत आदी आढळून आले आहे मात्र एकंदरीत पोलिसांची भूमिकाच बुचकळ्यात टाकणारी आहे.

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मध्ये चार सावकारांची नावे स्पष्टपणे पहिल्या पानावरच होती याची चर्चा नगरमध्ये आहे . याचे पैसे घेतले आणि त्याचे पैसे दिले,असे पवार यांनी यात स्पष्टपणे म्हटले होते , तसेच त्यांनी आता माझ्या आत्महत्येनंतर कुटुंबाला त्रास दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही पवार यांनी त्यात म्हटले होते . चौकशी चालू आहे ह्या गोंडस नावाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी ह्या कुटुंबास अक्षरश: झुलवत ठेवले.

पवार यांचा दहावा-तेरावा होईपर्यंत आणि कोणी पुढे येऊन फिर्याद देईपर्यंत कोतवालाच्या पोलिसांनी ह्या चारही सावकारांना मोकळे सोडले . आज फक्त एक सावकार सापडला असून त्याचा जामीन होऊन तो बाहेर आहे मात्र इतर ३ जणांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे . या कालावधीत ह्या सर्व सावकारांनी आणि त्यांच्या पाठिराख्यांनी त्यांच्याकडील सर्व स्टॅम्प, कागदपत्रे नष्ट केली नसतील असे कशावरून ?  नवनाथ वाघ यालाच बळीचा बकरा बनवायचे नियोजन आधीपासून केले होते का ? फक्त एकच सावकार का सापडला बाकीचे पोलिसांना मिळू नयेत अशी परिस्थिती खरोखरच आहे का ? जर पवार यांच्या आत्महत्येच्या दिवशी ह्या चारही सावकाराना ताब्यात घेतले असते तर ह्या केसचे सगळे पत्ते खुलले असते.अद्याप देखील बाळासाहेब पवार यांना पैशासाठी त्रास दिलेल्या सर्व सावकारांची नावे उघड झालेली नाहीत. फिर्याद दाखल होऊन देखील नावे उघड न करण्याची नगरची प्रथा बहुदा जगात एकमेव ठरावी .

आता कदाचित उर्वरित गुन्हेगार सापडतील देखील मात्र पुरावे नष्ट केल्यानंतर सापडून तरी काय होणार ? न्यायालयापुढे पुरावेच नसतील तर शिक्षा तरी कोणाला व कशी होणार ? तसे पाहता अभय परमार यांनीच दिरंगाई केल्याचे ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार ? केडगाव हत्याकांडानंतर ते आधीच निलंबित आहेत याही पुढे जाऊन त्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का ? हे येत्या काळात स्पष्ट होईल मात्र नगरचा बिहार झालाय हे मात्र नक्की .

पवार यांच्या आत्महत्येनंतर खरे तर नगर पोलिसांना शहरातील अवैध सावकारीचा भंडाफोड करण्याची अमूल्य अशी संधी होती ती त्यांनी गमावली. नंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी फिर्याद दाखल होईपर्यंत ह्या प्रकरणाचा काहीच तपास केला नाही पर्यायाने आरोपीस पुरावे नष्ट करण्यास व पळून जाण्यास वेळ मिळाला . पवार यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत सावकारांनी आपल्याला कशा प्रकारे त्रास दिला याचा उल्लेख असून देखील ह्या सावकारांची साधी चौकशी पोलिसांनी करण्याची देखील हिम्मत का दाखवली नाही किंवा ही नावे लपवून पोलीस कोणाला कव्हर करत आहेत ?

नगर पोलिसांची भूमिका का संशयास्पद ? बाळासाहेब पवार प्रकरण : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांवर पोलीस शांत का ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांना कुणी छळले होते ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

नगरच्या कोतवाली पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

वा रे सेटिंग .. नयन पाटील यांचे बॅचमेट केडगावमधील : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

नगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या : काँग्रेसच्या नेत्याच्या दहशतीमुळे मृतदेह रस्त्यावर पडून

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील काय ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा