नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले : मावळची पुनरावृत्ती करत पोलिसांचा गोळीबार

By | November 15, 2017

police fires on farmers in ahmednagar district protesting for sugarcane rate

नगर जिल्हातील शेवगाव,नेवासा व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, उसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. अत्यल्प वेळातच आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सुरूवातीला त्यांच्यावर लाठीमार केला. मात्र, तरीही आंदोलक माघार घेत नसल्याने पोलिसांनी या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व हवेत गोळीबार केला. मात्र पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त नाकारले आहे.

मात्र ह्या गोळीबारात एक छरर्रा शेतक-याच्या छातीत घुसला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या हाताला इजा झालीआहे .पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराचा मारा केला केल्याचे कबूल केले आहे मात्र गोळीबार केला नसल्याचे पोलीस म्हणत आहेत .

मात्र यानंतर मोठी धावपळ झाली आणि झालेल्या धावपळीत काही शेतकरी जखमी झाल्याचे समजत आहे. उद्धव मापारे आणि बाबुराव दुकळे हे दोन शेतकरी गोळीबारात गंभीर जखमी झाले असून शेवगाव येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ऊसाला ३ हजार १०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

ऊस उत्पादक शेतक-यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार १०० रुपये एकरकमी भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरु आहे . शेवगाव तालुक्यातील घोटण येथे सोमवारपासून उसाने भरलेली वाहने अडविण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र बुधवारी ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

मात्र हे आंदोलन चिघळले असून, पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या १५ जणांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले, रस्त्यावर लाकडे जाळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती , पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. खानापूर येथे अश्रूधुराचा मारा केला. मात्र आंदोलक ऐकत नाहीत म्हणून हवेत गोळीबार देखील केला असल्याचे लोक म्हणत आहे . ह्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले असून, उद्धव मापारे व बाबुराव दुकळे या जखमी शेतकऱ्यांना शेवगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. पोलिसांकडून लाठीमार सुरू होताच आंदोलकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

अर्थात पोलिसांनी गोळीबार केला असे नाकारले असले तर मग गोळीबार केला तरी कोणी ? ह्या प्रश्नाचे कोणाकडेही उत्तर नाही .

यापूर्वी पुणे जिल्ह्यातील मावळ येथे शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. तेव्हा कडाडून निंदा करणारे आज सत्तेत आल्यावर ते देखील ह्याच पद्धतीने शेतकऱ्यांशी वागणार का ? , मग सरकार बदलून काय मिळाले ? असा संतप्त सवाल शेतकरी आता विचारत आहेत.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?