आश्विनी बिद्रे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई : ‘ हे ‘ दोन जण उचलले

By | December 11, 2017

ashwini gore is missing since last 18 months family blames seniors

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपच्या मोठ्या नेत्याचा भाचा राजेश पाटील यांस कळंबोली पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. सोमवारी पनवेल न्यायालयात पाटील यांना हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश पाटील हे भुसावळ तालुका भाजपचा युवा मोर्चा अध्यक्ष आहेत .अनेक बड्या हस्तींसह पाटील भागीदारीने व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आश्‍विनी गोरे-बिद्रे बेपत्ता झाल्या त्यादिवशी राजेश पाटील यांचे आरोपी अभय कुरूंदकर सोबत फोनवर संभाषण झाले होते,तसेच त्या दिवशी अश्विनी बिद्रे, कुरुंदकर आणि पाटील एकाच स्थळी होते, असा युक्तिवाद ह्या प्रकरणी पोलिसांकडून करण्यात आला आहे.

ज्या दिवशी अश्विनी बेपत्ता झाल्या त्यादिवशी अभय कुरुंदकर, अश्विनी बिद्रे व राजेश पाटील यांचे मोबाईल लोकेशन भाईंदर मध्ये एकाच ठिकाणी होते. आश्‍विनी बेपत्ता झाल्या त्यादिवशी राजेश जळगावहून अंधेरी येथे आला होता, आणि प्रवासादरम्यान अभय कुरुंदकर यांचे राजेश पाटील सबत मोबाईलवर संभाषण सुरु होते .पोलिसांनी दोन दिवस केलेल्या चर्चेत राजेश पाटील याने पोलिसांच्या तपासात सहकार्य न केल्याची बाब पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली होती .

याच प्रकरणामध्ये सांगलीच्या कुपवाडमधून देखील आणखी एका व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. अभय कुरुंदकर तीन वर्ष सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना, त्याचा संपर्क एका व्यापाऱ्य़ाशी वारंवार आला. अश्विनी बिद्रे गायब होण्याआधी कुरुंदकरने राजेश पाटील आणि त्या व्यापाऱ्याला वारंवार फोन केल्याचे उघड झाले होते त्यामुळे ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आल्याचे बोलले जातंय .

आता पोलीस कोठडीमधूनच काय ते सत्य बाहेर येईल अशी आशा अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांना आहे. अश्विनी गायब झाल्यानंतर अभय कुरुंदकर यांनी भाईंदर मधील घराचा रंग बदलला. रंग का बदलला, काही आक्षेपार्ह घटना घडली आहे का, याचा पोलिसांनी कोर्टासमोर संशय व्यक्त केला होता. तसेच कुरुंदकर याच्या घरात महिलेचे केस आढळून आले आहेत, त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये गूढ अजूनच वाढले आहे.

काय आहे प्रकरण

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्याचवेळी त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. आणि अश्विनी बिद्रे यांचे नाव अश्विनी गोरे झाले. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती,पुढे 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. तिथे देखील अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी येत असत मात्र कोंबड झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही. लवकरच हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

हे प्रकरण अश्विनी यांच्या घरी समजल्यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये वादाला सुरुवात झाली. कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. पुढे 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्याने घरच्या पत्त्यावर पाठवलं तेव्हा अश्विनी गायब असल्याचे घरच्यांच्या लक्षात आलं. व त्यांनी कुरुंदकर यांच्यावर संशय व्यक्त करत कळंबोली पोलिसात तक्रार दाखल केली. अभय कुरुंदकर या पोलिस अधिकाऱ्यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा घातपात केल्याचा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

घरच्यांनी मग शोध घ्यायला सुरु केलं, आणि अश्विनी यांचा कॉम्प्युटर ओपन केला तर त्यात अश्विनी यांनी कुरुंदकर यांच्यासोबतच सर्व संवाद रेकॉर्ड करून ठेवले होते, त्यात अभय कुरुंदकरांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय कुरुंदकर हे तात्काळ रजेवर गेले होते मात्र अखेर आता त्यांना अटक झाल्याने बऱ्याच गोष्टी उघड होतील ,आणि सत्य बाहेर येईल अशी शक्यता आहे.

अश्विनी व अभय यांच्यातील भांडणाचा एक व्हिडीओ देखील पोलिसांच्या तसेच मिडीयाच्या हाती लागला असून त्यात अभय हे अश्विनी हिस गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या फुटेज सोबतच इतरही पुरावे हस्तगत करण्याचे काम सुरु केले आहे

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

तब्बल ‘ दीड ‘ वर्षांपासून ह्या महिला पोलीस अधिकारी गायब : तरीसुद्धा पोलिसांचे सहकार्य नाही

सांगलीतील अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणाला एक नवीन वळण : नातेवाईकांचा गंभीर आरोप

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर होता ‘ याचा ‘ नंबर : कामटेचे पुढचे फसलेले टार्गेट

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?