पुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण ?

By | October 15, 2017

bank robbery 9 cr invested 600 meter long bhayyan

वाघोली येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडत असताना लोणीकंद पोलिसांनी रविवारी पहाटे दोन जणांना रंगेहाथ पकडले मात्र त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला . ही घटना वाघेालीतील साईसत्यम पार्क परिसरात घडली.ऋषी चंद्रेश्वर शर्मा (वय 29), गणेश निश्चींद्र ठाकुर (वय 20) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र विजय रामचंद्र कदम (सर्व रा. लोहगाव ) हा फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, लोणीकंद पोलिसांचे पथक रात्री आव्हाऴवाडी परीसरात गस्त घालत हेाते त्यावेळी साईसत्यम पार्क परिसरातील एटीएमजवळ काहीतरी गडबड असल्याची माहीती कंट्रोल रुमवरुन गस्त पथकाला मिळाली. गस्त पथकाने त्वरीत त्या एटीएमकडे धाव घेतली. यावेळी एटीएमचे शटर बंद आढळून आले . मात्र बंद शटरमध्ये दोन जण एटीएम फोडण्याचा उद्योग सुरु होता तर त्यांचा एक साथीदार बाहेर देखरेख करीत होता. पोलिस आल्याचे पाहून त्याने बाहेरच्या बाहेर धूम ठोकली मात्र जाताना आतील साथीदारांना पोलीस आल्याची खबर दिली .

पुढे पोलिस शटर जवळच दबा धरुन बसले.आतील दोघांनी पळून जाण्यासाठी शटर उघडे करताच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानी मशीनचा काही भाग काढला होता. तर इतर हत्याराच्या द्वारे ते भाग फोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडे छोटया कटावणी, स्क्रुडायव्हर, पक्कड व अन्य साहित्य सापडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तेारडमल, पोलिस कर्मचारी संतेाष कुलथे, अमोल दांडगे, मेघराज जगताप यांनी ही कामगिरी केली. ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यांच्याकडून अजून काही गुन्ह्यांची देखील उकल होऊ शकेल.

फोडण्याचा प्रयन्त केलेले हे एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आहे. येथे कोणीही सुरक्षारक्षक तैनात केलेला नव्हता ,त्यामुळे पाळत ठेवून हा प्रयत्न करण्यात आला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे . मात्र एटीएमच्या आतील सुरक्षित यंत्रणेमुळे याबाबतची माहीती बॅंकेच्या मुंबई कार्यालयाला कळाली. त्यांनी त्वरीत पुणे पोलिसांच्या कंट्रेाल रुमला कळविली मग लोणीकंद पोलिसांच्या पथकाला ही माहीती मिळाली आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत ह्या भामट्याने अटक केली.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply