सावधान : ‘ ह्या ‘ कारणांनी २०१८ ला पेट्रोल जाऊ शकेल १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे

By | January 1, 2018

petrol will cross 100 rs per liter in 2018

२०१८ मध्ये पेट्रोल डिझेल तसेच इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त आपले आर्थिक गणित ढासळणार नाही तर कदाचित सायकल चालवण्याचे दिवस पुन्हा येऊ शकतात.

मध्य पूर्व देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अराजक माजलेले आहे. येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबियाला इराणच्या विरोधात लढावे लागेल.इराणमध्ये सध्या सरकारच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. वेगवेगळ्या शहरामधून सरकारच्या विरोधात मोर्चे निघत असून सरकार विरोधी घोषणांनी इराण दणाणून गेले आहे . इराणमध्ये तशी सुबत्ता आहे मात्र सरकार इराणच्या पैशाचा वापर हा सीरिया बंडखोरांना मदत कारण्यासाठी करत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे . ‘ इराण फर्स्ट ‘ ही या आंदोलनकऱ्यांची भूमिका आहे,त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारच्या समर्थनार्थ देखील मोर्चे निघत आहेत, मात्र हे मोर्चे पैसे देऊन व आंतरराष्ट्रीय समूहाची दिशाभूल व्हावी म्हणून काढले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे . अशा अराजक पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची चिन्हं जास्त आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांना होणार आहे तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका आणि तुर्कीसारख्या देशांना मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागेल अशी परिस्थिती आहे. असे झाले तर भारतात पेट्रोलच्या दरात सुमारे ३० टक्के वाढ होऊन १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे पेट्रोल जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सध्या भारतात पेट्रोलचा दर हा ७७ ते ८० रुपयांदरम्यान असून लवकरच तो १०० पार होऊ शकतो . असे झाले तर पालेभाज्या, प्रवास अन अन्नधान्यामध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार आल्यानंतर कच्च्या तेलाचे भाव खूप खाली आले होते मात्र सरकारकडून दर कमी केले गेले नव्हते, त्यावरून सरकारवर बरीच टीका देखील करण्यात आली होती. मात्र आता १०० च्या पुढे जर दर गेले तर सरकारला मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागू शकतो .

सध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या 21 रूपयांना मिळतं. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगं बनवण्यात त्याला 10 रूपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर 31 रूपयांमध्ये पेट्रोल मिळू शकतं. पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून वेगळा कर आकारला जातो . त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते.याशिवाय भारताच्या सर्व शेजारील राष्ट्रात देखील भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल व डिझेल चे रेट आहेत.

‘ हे ‘ झाले तर पेट्रोल होऊ शकते तब्बल २५० रुपये लिटर

मुजोर रिक्षावाल्याची भलत्या ठिकाणी दादागिरी आली अंगलट : अक्षरश: ठेचून मारले

पोलिसांची ‘ ह्या ‘ मदरश्यावर धडक कारवाई : तब्बल ५१ मुलींना ठेवले होते डांबून

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?