‘ हे ‘ झाले तर पेट्रोल होऊ शकते तब्बल २५० रुपये लिटर

By | November 17, 2017

petrol and diesel price cut down in maharashtra and mumbai

गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल ह्या भडकलेल्या दरामुळे आधीच सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कच्च्या तेलाचे दर अंतरराष्ट्रीय बाजारात जरी कमी झाले असले तरी आपल्याकडे असलेल्या कर प्रणालीमुळे ते कमी होत नाही. जीएसटी च्या टप्प्यात पेट्रोल व डिझेल ला घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र तोवर आपल्याला दणकून पैसे मोजावे लागत आहेत .

अर्थात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने काही प्रमाणात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं. मात्र, आता पून्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे भडकण्याची चिन्हे आहेत . अर्थात आता हे दर भडकले तर मात्र सायकल चालवण्याशिवाय पर्याय राहणार नाही . पेट्रोल व डिझेल दर २५० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे याचे मुख्य कारण आहे , इराण आणि सौदी अरब यांच्यातील तणाव.

इराण आणि सौदी अरब यांच्यातील तणाव वाढतच आहे. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होईल.इराण हे शिया बहुल मुस्लिम राष्ट्र आहे तर सौदी हे सुन्नी बहुल राष्ट्र आहे . ह्या दोन राष्ट्रांमध्ये कायम धुसफूस चालू असते. सध्या दोघांचे संबंध ताणले गेलेले आहेत , मात्र यदा कदाचित सौदी अरब आणि इराण यांच्यात युद्ध सुरु झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल ५०० % ने वाढ होऊ शकते. युद्ध सुरु होताच कच्च्या तेलाची किंमत २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकते.सध्या कच्च्या तेलाची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक आहे.

ईराण आणि सौदी अरब यांनी एकमेकांच्या तेल रिफायनरीवर हल्ला केल्यास कच्च्या तेलाची किंमत ३०० डॉलर प्रति बॅरल होऊ शकते. त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किंमतीचा दर तब्बल २५० रुपयांवर पोहचू शकतो.

ही माहिती केडिया कमॉडिटीचे एमडी अजय केडिया यांनी झी न्यूजशी बोलताना दिली आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता हे अशक्य आहे कारण सर्वात जास्त कच्चे तेल आयात करणारा अमेरिका सध्या कच्चे तेल एक्स्पोर्ट करत आहे तर चीन कडून देखील कच्चे तेल आयात करण्यात कोणती वाढ झालेली नाही. अर्थात अमेरिकेकडून घेणे भारताला अंतर जास्त असल्याने परवडणार देखील नाही.

त्यामुळे २५० रुपये लिटर इतका पेट्रोल-डिझेलचा दर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, महागाईही मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?