पैशांनी नव्हे तर आता रुपयांनी होणार पेट्रोल डिझेल दरवाढ : वाचा पूर्ण बातमी

By | May 18, 2018

petrol hike upto 4 rupees

मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात ह्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे . ब्रोकरेज कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीच्या आधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये तब्बल चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.असे झालेच तर आधीच महागाईने वैतागलेल्या जनतेचे कंबरडे मोडणार असून पुन्हा सायकल चालवण्याची वेळ येऊ शकते .

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतांना फटका बसू नये म्हणून थोपवलेली पेट्रोल डिझेल दरवाढ मतदान होताच परत बेलगाम झाली आहे. गेल्या 19 दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आधीच वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 21 पैसे याआधीच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्यानं ही दर वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र कर्नाटक निवडणुकीच्या हेतूने गेल्या 19 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती.कर्नाटक इलेक्शन झाल्यावर लगेच दरवाढ होऊ शकते हे आम्ही वर्तवलेले भाकीत अखेर खरे ठरले आहे.मात्र आता या पुढे देखील पेट्रोल डिझेलचे दर अजून महाग होण्याची शक्यता आहे.

गुरूवारी पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा २२ ते २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या किंमती २२ ते २४ पैशांनी वाढल्या. इंडियन ऑइल कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८३.१६ रुपये प्रतिलिटर झाले, तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७१.१२ रुपये झाले आहे. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.३२ रुपये मोजावे लागत आहेत. जवळपास ५६ महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती ७६.३२ रुपयांना पोहोचल्या होत्या. एक लिटर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६६.७९ रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांनी दिल्लीमध्ये गाठलेला हा उच्चांक असल्याचं बोललं जात आहे.

मात्र आता ही दरवाढ केवळ सोशल मीडियापर्यंतच आणि लोकांच्या खिशापर्यंतच राहते . त्याची बातमी होत नाही . मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात चाललेले अर्धा अर्धा तास महागाईचा भस्मासुर आणि आगडोंब वगैरे कार्यक्रम केले जात नाहीत . बहुतेक असेच अच्छे दिन आले आहेत कि काय अशी परिस्थिती आहे. मिडीयावर परदेशातील लोकांच्या चरित्रावर तास तास चर्चा होतात मात्र आता मनमोहन सिंग यांच्या काळात महागाई होती तीच आता विकास नावाने असल्याने त्याची बातमी बनत नाही .

आणि बोलल्याप्रमाणे कर्नाटक मतदान होताच पेट्रोल डिझेल महागले : ‘ हा ‘ आहे नवीन रेट

अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाविरोधात पुकारलेल्या भारत बंद आंदोलनातील ‘ हा ‘ फोटो तुम्हाला आलाय का ?

‘ हे ‘अस्त्र आपल्यावर उलटू नये म्हणून भाजपकडून लोकशाहीची मुस्कटदाबी : २०१९ ची तयारी

मागच्या १ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे होते हे दर : झाली तब्बल ‘ इतकी ‘ वाढ

सावधान : ‘ ह्या ‘ कारणांनी २०१८ ला पेट्रोल जाऊ शकेल १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे

‘ हे ‘ झाले तर पेट्रोल होऊ शकते तब्बल २५० रुपये लिटर

पोलिसांची ‘ ह्या ‘ मदरश्यावर धडक कारवाई : तब्बल ५१ मुलींना ठेवले होते डांबून

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा