खुशखबर : पेट्रोल डिझेल झाले स्वस्त आता ‘ हा ‘ असेल नवा दर

By | October 9, 2017

petrol and diesel price cut down in maharashtra and mumbai

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करत सामान्यांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे आता राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयानी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राकडून हे पाऊल उचलण्यात आले.

मात्र देशातील इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढेच राहणार आहेत. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २५ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २६ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे ११ रुपयांचा अधिभार आकारला जातो. डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २१ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २२ टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला १९ हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. मात्र, आता व्हॅट कमी केल्याने सरकारला २८०० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याच आहेत. मात्र पेट्रोल व डिझेल च्या बाबतीत सरकारला म्हणावा एवढा दिलासा लोकांना देता आलेला नाही . त्यामुळे लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. २०१४ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त होते. त्यावेळी देशात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. सध्या कच्चा तेलाच्या किंमती त्यातुलनेत काही पटीत होऊनदेखील पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटर या दरानेच फ़क्त केंद्र व राज्य सरकारच्या करामुळे मिळत होते . विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. जनतेच्या या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने गेल्या मंगळवारीच पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले होते. मात्र आता राज्य सरकारने देखील व्हॅट केल्यावर लोक सरकारवर खुश होणार काय , याचे उत्तर येत्या काळात मिळेलच

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?