धक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना

By | November 23, 2017

person burnt alive for 1 crore rupees in nagpur

नागपूर मधूला दारोडकर चौकातून एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याला जिवंत जाळण्यात आल्याची बातमी आहे. बुटीबोरी येथे जाळून सापडलेला मृतदेह हा अपहृत केलेले व्यापारी राहुल सुरेश आग्रेकर (३२) यांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचाच असल्याचे वस्तुजन्य पुराव्यावरून स्पष्ट झाले असल्याचे पोलीस म्हणतात आहेत मात्र डी.एन.ए. टेस्ट झाल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ असे आग्रेकर यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

राहुल सुरेश आग्रेकर (३२) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. दुर्गेश दशरथ बोकडे व पंकज हारोडे ह्या त्यांच्या साथीदाराविरुद्ध लकडगंज पोलिसांनी तूर्त खंडणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अपहरणकर्ते मात्र सध्या फरार आहेत.

राहुल यांची दारोडकर चौकात जैन लॉटरी एजन्सी आहे. ते मोठ्या प्रमाणात विदर्भातील लॉटरी सेंटर्सना लॉटरीचा पुरवठा करत होते . राहुल यांचे अपहरण करणारे दुर्गेश बोकडे व पंकज हारोडे हे एकमेकांशी परिचित होते . मागील आठ वर्षांपासून त्यांची एकमेकांशी ओळख होती, मात्र काही दिवसांपासून तिघांमध्ये पैशाचा वाद सुरु होता त्यातूनच ही हत्या झाली असावी असे बोलले जात आहे.

दुर्गेश बोकडे याने पंकजच्या मदतीने राहुल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा प्लॅन केला . मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास ते बोलेरो गाडीमधून दारोडकर चौकात आले व राहुल यांना घेऊन तिघेही बाहेर पडले. त्याच दिवशी सकाळी ११. ३० च्या दरम्यान राहुल यांनी पत्नी अर्पिता यांच्या मोबाइलवर राहुल यांनी फोन केला व मी दीड तासात घरी येतो असे सांगितले. नंतर परत दुपारी २ वाजता राहुल यांचे मोठे बंधू जयेश यांच्या मोबाइलवर राहुलच्या मोबाइलवरून फोन आला व आता राहुल जिवंत हवा असेल तर १ कोटी रुपये दे असे धमकावण्यात आले. हा आवाज दुर्गेश ह्याचा होता .

पोलीस तपासामध्ये राहुल, दुर्गेश व पंकज हे सकाळी ११.४५ ते दुपारी २.१० वाजतापर्यंत बुटीबोरीतील पेटीचुहा येथे होते. तिघांचे मोबाइलचे लोकेशन ह्याच परिसरात होते . त्यामुळे राहुल यांनी जिवंत जाळून मारण्यात आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे तसेच ह्या मृतदेहाजवळ चाव्या, किचैन व जीन्स पॅन्ट वरचा लोगो देखील आढळला आहे. हे साहित्य राहुल यांचेच असल्याचे समजते.मात्र जोपर्यंत डीएनए चाचणी होत नाही तोवर मृतदेह कोणाचा आहे हे स्पष्ट होणार नाही त्यामुळे,हा मृतदेह सध्या राहुल यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. डीएनए चाचणी झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.

महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे.

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

सांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार ? : मूर्तीसमोर आढळला मृतदेह

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?