सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

By | November 27, 2017

revenge porn cases in pune to take revenge of girlfriend

सेल्फी स्टिकच्या मदतीने शेजारच्यांच्या बेडरूम मधील खाजगी क्षण रेकॉर्ड करून नंतर त्या क्लिपच्या माध्यमातून महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत ब्लॅक मेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे . विशेष म्हणजे हा आरोपी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मोठ्या हुद्दयावर असल्याचे समजते . हा आरोपी ह्या क्लिप्सच्या माध्यमातून महिलेला ब्लॅकमेल करत होता.

पुणे मिररनेच्या वृत्तानुसार, २४ नोव्हेंबरला पीडित जोडप्याने हिंजेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शेजारी कुंदन आष्टे विरोधात तक्रार दाखल केली. त्यांचा आरोप आहे कि कुंदनने फोन कॅमेरा आणि सेल्फी स्टीकच्या मदतीने बेडरूममधील खाजगी क्षण रेकॉर्ड केले आणि नंतर ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात शेअर करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. पीडित जोडपे एकांतात असताना त्यांना बेडरूमच्या जवळ काहीतरी हालचाल दिसली आणि त्यांनी कुंदनला रंगेहाथ पकडले. पकडले गेल्यानंतर कुंदनने गुन्हा कबुल केला आणि असे आपण गेल्या ३ महिन्यापासून करत असल्याचे देखील मान्य केले.

पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कुंदन आष्टेने महिलेला तिची क्लिप पाठवली आणि ब्लॅकमेल करत त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले. आष्टे ने धमकी दिली की, तिने तसे केले नाही तर तो ती क्लिप सोशल मीडियात अपलोड करेल. याबाबत तिने पतीला सांगितले आणि कुंदनविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कुंदन आष्टे च्या विरोधात तक्रार नोंदवली असून तो झालेल्या घटनेच्या दिवसापासून फरार आहे.

हिंजेवाडी पोलीस स्टेशनचे इंचार्ज रंगनाथ उंडे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात हे दोघे बेडरूममध्ये होते आणि तेव्हाच त्यांना खिडकीबाहेर काहीतरी विचित्र दिसले. ते खिडकीजवळ गेले असता त्यांना कुंदन फोन सेल्फी स्टीकवर लावून रेकॉर्ड करत असल्याचे दिसले. त्यानंतर सोसायटीच्या इतर सदस्यांना सोबत घेऊन तक्रारदारांनी कुंदनला याबाबत जाब विचारला तर त्याने तो गेल्या तीन महिन्यांपासून हे करत असल्याचं मान्य केलं.ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत हा तरुण संबंधित महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी करत होता.मात्र जोडप्याने धाडस दाखवले आणि त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.

मोबाईल आणि इंटरनेट पॅक स्वस्त होत असले तर त्यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे . चांगला इंटरनेट स्पीड आणि अश्शील वेबसाईट मुळे सहज उपलब्ध होणाऱ्या नको त्या गोष्टी , यातून हे प्रमाण वाढत आहे हे सत्य देखील नाकारून चालणार नाही.

लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--