प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

By | November 23, 2017

person attacks his lover in bhosari pune

महिलांवर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून , ह्या प्रकरणी कठोर शिक्षा होत नसल्याने पुरुषांकडून असे पाऊल उचलले जाते . बातमी आहे पुण्यातील

पुण्यामध्ये भोसरी येथे एक तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्याच्या मुलीवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे . सदर महिला यात किरकोळ जखमी झाली असून ह्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत . ही घटना बुधवारी रात्री ८:३० च्या दरम्यान भोसरी येथे घडली. ह्या हल्लेखोर तरुणाचे नाव दीपक गायकवाड असे असल्याचे समजते . हल्ला केलेली महिला ही त्याची आतेबहीण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक गायकवाड ह्याचे त्याच्या आत्याची मुलगी स्वप्नाली गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र स्वप्नालीचा विवाह झाला असून तिला दोन मुले देखील आहेत. मात्र ते लग्नानंतर देखील भेटत असत. असाच तो बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्वप्नालीला भेटायला बालाजी नगर भोसरी येथे आला होता. त्यावेळी त्यांच्यात भांडण सुरु झाले आणि एकाएकी स्वप्नालीने दीपकला यापुढे मला भेटत जाऊ नकोस असं बजावल. मात्र त्यामुळे दीपकचा राग अनावर झाला व त्याने रागातून दीपकने स्वप्नालीवर ब्लेडने वार केले. ह्यात ती किरकोळ जखमी झाली असून खाजगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत .

हल्लेखोर दीपक हा एका कंपनीत कामाला असून तो बालाजी नगरपासून काही अंतरावरच राहतो. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

बऱ्याचदा प्रेमाचा शेवट हा सुखकर न झाल्याने अपयशी प्रेमवीरांकडून असे पाऊल उचलले जाते. काही दिवसापूर्वी मोशीमध्ये देखील एका मुलीने प्रियकराकडून आपली फसवणूक झाल्याची समजूत करून आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला संपवल्याची घटना सासवड इथे घडली होती. तर आळंदी इथे विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरते म्हणून पत्नीस पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले होते. बहुताश घटनांमध्ये महिलांचाच बळी जात असल्याने, महिला सबलीकरणाच्या नुसत्या गप्पाच आहेत का , असा प्रश्न उभा राहतो . कारणे कोणतीही असोत शेवटी बहुतांश प्रकरणामध्ये बळी जातो तो महिलेलाच . पुरुषप्रधान संस्कृतीला लाज वाटावी अशा एकापेक्षा अधिक घटना रोज घडत असतात. जोपर्यंत पुरुषी मानसिकतेतून महिलेला देखील एक माणूस भावनेतून पहिले जाणार नाही. तोपर्यंत अशा क्रूर घटना कमी होणार नाहीत.

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?