कोपर्डीच्या दोषींबद्दल ‘ त्या ‘ निनावी फोनचे रहस्य उलगडले : हे होते कारण

By | December 5, 2017

person arrested for making false call to police about kopardi case

कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जिल्हा कारागृह अधीक्षकांना एक फोन आला़ ‘मी मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए बोलतोय’, असे सांगत तिन्ही आरोपींना फाशी झाली असून, त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्याचे फर्मान सोडले. पुन्हा जरा वेळाने फोन करून ‘एसपी बोलतोय’ असे सांगत तोच निरोप दिला. रात्री आठ वाजता त्याच व्यक्तीने पुन्हा फोन करून ‘पोलीस महासंचालक बोलतोय’ असे सांगत येरवडा कारागृहात आरोपींना तातडीने वर्ग करा. तेथेच ते सुरक्षित राहतील असे सांगितले़ हा फोन तोतया व्यक्तीकडून येत असल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले़ शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती . आलेल्या नंबरवरून पोलिसांनी शोध सुरु केला आणि त्याच्यापर्यंत पोहोचले, मात्र त्याला पकडल्यानंतर त्याने फोन केल्याचे जे कारण सांगितले आणि क्षणभर सर्व पोलीस देखील भावूक झाले.

काेपर्डीतील अाराेपींना पुण्याच्या कारागृहात हलवण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नावाने पाेलिसांना फोन करणाऱ्या अमित कांबळे या ताेतयाला नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या कृत्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता मात्र त्याने जे कारण सांगितले ते दुर्दैवी म्हणावे लागेल.

अमित कांबळेची दोन्ही मूत्रपिंडे निकामी आहेत. त्याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले असून त्याच्या घरात दुसरे कुणीच नाही. डायलिसिससाठी दोन दिवसाआड साडेचार हजार रुपये लागतात. कामधंदा काही नसल्याने त्याची तजवीज होत नाही. उपचारासाठी त्याने अशी शक्कल लढवली होती. अमित चक्क कधी मुख्यमंत्र्यांच्या नावे, तर कधी पोलिस महासंचालकांच्या नावे, तर कधी थेट पोलिस आयुक्तांच्या नावाने फोन करून खोटी माहिती द्यायचा. त्यानंतर पोलिस त्याला अटक करायचे. अटकेनंतर तो आपल्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे पोलिसांना सांगायचा. पोलिसही त्याच्या तपासणीनंतर त्याच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर डायलिसिस करायचे. हा प्रकार त्याने वारंवार केला होता .त्याच्यावर याआधी देखील अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नगरच्या पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने ही बाब पोलिसांना सांगितली.

आपण पाकिस्तानच्या नागरिकांचे उपचार करून देतो मात्र आपल्याच नागरिकांवर अशी वेळ यावी ही दुर्दैवी गोष्ट आहे.

छकुलीला अखेर न्याय मिळाला कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा : सविस्तर बातमी

कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

अखेर कोपर्डी केसच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात : उज्ज्वल निकम मांडताहेत सरकारची बाजू

‘ ह्या ‘ कारणामुळे नाही होऊ शकला कोपर्डी केसचा अंतिम युक्तिवाद

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?