३१ डिसेंबरच्या आधीच रंगली होती जंगलात पार्टी : २ तरुणी व १० तरुण रंगेहाथ पकडले

By | December 21, 2017

party raided by police in mahabaleshwar lingmala parisar12

Photo: Not Actual

महाराष्ट्रातील काश्मीर अशी ओळख असलेलं महाबळेश्वर हे सध्या अनेक गैर प्रकारामुळेच बदनाम होत आहे. वन विभाग व पोलिसांनी नुकतीच धाड टाकून अशा एका पार्टीचा पर्दाफाश केला. महाबळेश्वरातील लिंगमळा धबधब्याच्या गेटवर तीन अलिशान गाड्या उभ्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या गाड्या थांबल्याने स्थानिक लोकांमधे याबद्दल कुतूहल तयार झाले. इतक्या थंडीमध्ये आणि ते देखील गर्द अशा झाडीत पर्यटक थांबत नाहीत , मग कुणाचा अपघात झालाय का ? अशी देखील शंका स्थनिकांना आली. त्यांनी याबद्दल वनविभागाला कळवले. वनविभागाने पोलिसांची मदत घेत ह्या ठिकाणी छापा घातला. पुढे दे दृश्य त्यांना दिसले, त्याने ते देखील अचंबित झाले. लिंगमळ्याच्या जंगलात बुधवारी रात्री ही पार्टी सुरू होती, मोठा गाण्यांचा आवाज व त्यावर मद्य धुंद अवस्थेत तरुण तरुणी बिभत्सपणे नृत्य करत होते.

महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरातील जंगलात सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी तरूण-तरूणींना ताब्यात घेतले आहे. सहभागी झालेले बहुतेक तरूण-तरुणी या उच्चभ्रू वर्गातील आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीत सहभागी झालेले तरूण-तरूणी दिव-दमण आणि अहमदनगर येथील मोठ्या कुटुंबातील असल्याचे समजते. पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा तरूण-तरूणी याठिकाणी गाण्यांवर बिभत्सपणे नृत्य करत होते. यावेळी आठ युवकांना दोन तरूणींसह ताब्यात घेण्यात आलेले आहे. या घटनेचा पंचनामा करून ह्या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून वाहनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा होता त्यामुळे ही वाहने देखील जप्त करण्यात आलेली आहेत.

अर्थात ही रेव्ह पार्टी होती कि हुक्का पार्टी याबद्दल अजून पोलिसांकडून काही स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. दरवर्षीप्रमाणे, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात पोलिसांकडून अशाप्रकारच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवली जात असते . मात्र ३१ डिसेंबरच्या आधीच अशी पार्टी रंगली होती त्यामुळे पार्टी करणार्यांना कोणता मुहूर्त नसतो हे देखील आपल्याला पाहायला मिळाले .शहराबाहेरील ठिकाणांसह पब किंवा नाइट क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पाटर्य़ासाठी समाजमाध्यमांवरून सांकेतिक निमंत्रने पाठवली जातात तसेच पार्टीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना अमली पदार्थ दिले जातात व इथूनच त्यांना ह्या पदार्थांची चटक लागते व ते ह्या विक्रेत्यांचे हक्काचे ग्राहक बनतात असे देखील याआधी आढळून आले आहे. यामध्ये सोशल मीडियाचा मोठा रोल असून सहा स्वरूपाच्या गोष्टी आल्या तर रिपोर्ट कराव्यात किंवा फॉरवर्ड तरी करू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?