अखेर लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खूनप्रकरणातील एक आरोपी धरला

By | November 30, 2017

pankaj harode arrested in murder case of rahul agrekar in nagpur

नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून अपहरण करून खंडणी मागितली आणि नंतर त्यांचा जाळून खून करण्यात आला . ह्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पंकज हारोडेला कोलकात्याहून नागपूर अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे .

1 कोटी रूपयांच्या खंडणीसाठी 21 नोव्हेंबर 2017 रोजी राहुल आग्रेकर यांचं त्यांच्या दुकानांमधून बोलेरो गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी कुटुंबियांना फोन करून 1 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र नंतर त्यांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. बुटीबोरी परिसरात त्यांचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचाच असल्याचे वस्तुजन्य पुराव्यावरून स्पष्ट झाले. राहुल यांना दुकानांमधून घेऊन जाताना पंकज हारोडे व दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा देखील सोबत होता. पोलिसांनी दुर्गेश व पंकज यांचासाठी मोठी शोधमोहीम राबवली होती.

राहुल आग्रेकर यांची दारोडकर चौकात जैन लॉटरी एजन्सी आहे. ते मोठ्या प्रमाणात विदर्भातील लॉटरी सेंटर्सना लॉटरीचा पुरवठा करत होते . राहुल यांचे अपहरण करणारे दुर्गेश बोकडे व पंकज हारोडे हे एकमेकांशी परिचित होते . मागील आठ वर्षांपासून त्यांची एकमेकांशी ओळख होती, मात्र काही दिवसांपासून तिघांमध्ये पैशाचा वाद सुरु होता त्यातूनच ही हत्या झाली असावी असे बोलले जात आहे.

दुर्गेश बोकडे याने पंकजच्या मदतीने राहुल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा प्लॅन केला . मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास ते बोलेरो गाडीमधून दारोडकर चौकात आले व राहुल यांना घेऊन तिघेही बाहेर पडले. त्याच दिवशी सकाळी ११. ३० च्या दरम्यान राहुल यांनी पत्नी अर्पिता यांच्या मोबाइलवर राहुल यांनी फोन केला व मी दीड तासात घरी येतो असे सांगितले. नंतर परत दुपारी २ वाजता राहुल यांचे मोठे बंधू जयेश यांच्या मोबाइलवर राहुलच्या मोबाइलवरून फोन आला व आता राहुल जिवंत हवा असेल तर १ कोटी रुपये दे असे धमकावण्यात आले. हा आवाज दुर्गेश ह्याचा होता .

दरम्यान, बुटीबोरी येथे राहुल यांचा जळालेला मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी लॉटरी सेंटर चालविणाऱ्या आणि राहुल यांचा मित्र असलेल्या दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोन संशयित आरोपींचा पोलिसांनी सोध सुरू केला होता . त्यास अखेर यश आले मात्र दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा अद्याप फरार आहे.

धक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

सांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार ? : मूर्तीसमोर आढळला मृतदेह

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?