चॅनेलवर बातम्या द्यायला आईसोबत लहान मुलगा आणि अँकर रडू लागली : काय आहे प्रकार ?

By | January 11, 2018

pakistani anchor on tv with kid & anika nisar cries on program

” मी आहे तुमची अँकर किरण नाज…तुम्ही पाहताय बुलेटिन 7 ते 8, पण आज मी अँकर नाही तर एक आई आहे…” असं म्हणत पाकिस्तानमधील समा वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरने एका चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध केलाय.तर दुसऱ्या एका चॅनेलवर ह्या घटनेचे वार्तांकन करत असताना आणिका निसार ह्या अँकरला रडू कोसळले, तिने लगेच ब्रेक घेतल्याचे सांगून वेळ निभावून नेली .

कोपर्डीसारखाच दुर्दैवी व मानवतेला काळिम्बा फासणारा प्रकार पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात घडला. चिमुरडीचे आई-वडील उमराह करण्यासाठी सऊदी अरबच्या यात्रेवर गेले असताना एक नराधम ह्या मुलीला बाहेर घेऊन गेला आणि पुढे तिच्यावर अत्याचार करून तिचा मृतदेह कचऱ्यात टाकून दिला. ही घटना पाकिस्तानमधील एका सी.सी.टी.व्ही मध्ये कैद झाली असून पोलीस ह्या नराधमाचा शोध घेत आहेत मात्र अद्याप त्यास पकडण्यात आलेले नाही. मात्र लोक या प्रकारानंतर रस्त्यावर आले आणि सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली . आंदोलन हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांना गोळीबार करावा लागला त्यात २ जणांचा मृत्यू झाला.

  • संबधित बातम्या

छकुलीला अखेर न्याय मिळाला कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा : सविस्तर बातमी

कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

पाकिस्तानमध्ये मंगळवारी एका 8 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद पूर्ण पाकिस्तानमध्ये उमटले आहेत . या घटनेच्या निषेधार्थ समा वृत्तवाहिनीची अँकर किरण नाज यांनी आपल्या मुलीला घेऊन स्टुडिओमध्ये बुलेटिनला सुरुवात केली. किरण नाजने बुलेटिनची सुरुवात नेहमी प्रमाणे केली, पण मी आज एक अँकर नाही तर एका मुलीची आई आहे. त्यामुळे मी इथं माझ्यामुलीसह आहे.कारण माझी मुलं घरी सुरक्षित नाहीत असे देखील त्यांनी म्हटले. पुढे त्या म्हणतात , “कहा जाता है कि जनाज़ा जितनी छोटा होता है, उतना ही भारी होता है. और ऐसा ही नन्हा सा जनाज़ा आज कसूर की सड़कों पर रखा है और पूरा पाकिस्तान इसके बोझ तले दबा हुआ है.” (https://www.youtube.com/watch?v=KrnBJa39Mq4)

तर दुसऱ्या एका चॅनेलवर ह्या घटनेचे वृत्तांकन करताना आणिका निसार ह्या अँकर ला रडू कोसळले, माझ्या देशात हे होतंय हे मला सहन होत नाही असे म्हणत त्यांनी मी भावनिक झाल्याने बोलू शकत नाही असे देखील म्हटले व ब्रेक घेतला . (https://www.youtube.com/watch?v=563UFMQWh5g )

  • संबधित बातम्या

पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा