बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

By | January 9, 2018

orkut coming back to india with name hello

इंटरनेटच्या विश्वात कधी कोण कुठे जाईल नेम नाही. व्यवसायाचे देखील गणित जोवर पैसे हातात येत नाहीत तोवर काय खरे नाही असेच आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीत देखील हे असेच लागू होते . एकेकाळी जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली ऑर्कुट ही गुगलची सोशल मीडिया वेबसाईट बंद झाली. एक काळ गुगलच्या ऑर्कुटने असा गाजवला होता कि ,काय करतोस हा प्रश्न आला तर समोरच्याचे उत्तर तयार असायचे , ऑर्कुटींग.. मात्र पुढे इंटरनेटवरील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास ऑर्कुट कमी पडली किंवा गुगल प्लस ला पुढे आणण्याच्या नादात गुगलने ऑर्कुट बंद केली. मात्र गुगल प्लस म्हणावे इतके पुढे आली नाही आणि ऑर्कुट देखील बंद झाले. ऑर्कुटचे सर्वाधिक यूजर भारत आणि ब्राझीलमध्ये होते.

मात्र आता ऑर्कुट परत एकदा जोरदार कमबॅक करणार आहे. येत्या दोन महिन्यामध्ये ही वेबसाईट भारतात सुरु होणार असून नाव मात्र बदलून येणार आहे . ह्या वेळी ह्या वेबसाईटचे नाव ‘ऑर्कुट’ नव्हे तर ‘हॅलो’ हे राहणार आहे . ह्या याबद्दलचे वृत्त द हिंदू ह्या वर्तमानपत्राने दिले आहे . भारतीय संस्कृतीमध्ये लोक एकमेकांशी जास्त प्रमाणात कनेक्टेड असतात. आपण एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी हॅलो या शब्दाचा वापर करत असल्याने साईटचे नाव हॅलो असे ठेवण्यात आले आहे, असे बुयुकोकटेन यांनी सांगितले. सध्या देखील आपण ऑर्कुट ओपन केले तर ऐप डाउनलोड करू शकतो,मात्र हे सध्या भारतात उपलब्ध नाही.

  • संबंधित बातम्या

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

अर्थात ऑर्कुट बंद झाले त्याचे प्रमुख कारण फक्त फेसबुक असे नाही, कारण गुगलचे असून देखील गुगलने गुगल प्लसला पुढे जाण्यासाठी मुद्दाम ऑर्कुटला संपवले असे देखील म्हणता येईल कारण शेवटी शेवटी ऑर्कुट अत्यंत स्लो झाले होते. एकतर कमी झालेला स्पीड आणि वरतून फेसबुक सारख्या कंपन्या मोठ्या होत असताना देखील गुगल, गुगल प्लस मधेच अडकून राहिले व शेवटी ऑर्कुट बंदच पडले. लोकांना सोशल मीडियामध्ये काय हवे आहे हे ओळखण्यात गुगल कमी पडली आणि त्यामुळेच ऑर्कुट बंद करावे लागले. अर्थात गुगलने याआधी देखील असे बरेच प्रयोग करून पाहिले आहेत. युट्युब विकत घेण्याआधी गुगलने गुगल व्हिडिओ चा प्रयोग केला होता मात्र तो चालला नाही. अर्थात आता काळ बदलला आहे, फेसबुक खूप पुढे गेले आहे . आपल्या वेबसाईटवर कन्टेन्ट टाकावे म्हणून फेसबुक पैसे देखील देते , त्यामुळे फेसबुकशी टक्कर म्हणजे अत्यंत अवघड आहे . फेसबुकचे सध्या दरमहा २०० कोटीहून अधिक अॅक्टीव्ह युजर्स असतात.

असो, या नव्याने येणाऱ्या साईटचे वातावरण इतके चांगले असेल की यावरुन कोणीही एकमेकांना जज करु शकणार नाही. ज्याप्रमाणे ऑर्कुटने सोशल मीडियामध्ये आपले स्थान निर्माण केले त्याचप्रमाणे ‘हॅलो’ही कमी कालावधीत लोकप्रिय होईल, अशी आशा आपण करूयात. २०१६ मध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे सुरु झालेली ‘हॅलो’ ही सोशल नेटवर्कींग साईट सध्या १२ देशांमध्ये उपलब्ध आहे .

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा