चिटफंडच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून ऑफिस बंद संचालक फरार

By | October 18, 2017

omisha chitfund cheated khairnar police complaint in pune

आकर्षक व्याजदर , २ वर्षात दामदुप्पट अशा आमिषाला सर्वसाधारण माणूस सहज बळी पडतो ते चतुर लोकांनी ओळखले आहे. सर्वसाधारण माणूस अशा स्वप्नांना लगेच भुलतो आणि सहज चोर लोकांच्या तावडीत सापडतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

पुण्यातील संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे . या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कंपनीच्या नऊ संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

राकेश खैरनार ( वय २८ , रा. नाशिक ) यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे . त्यानुसार भारती राजपूत, जुई परदेशी, मानसिंग घोरपडे, दत्तात्रय टकले ,कैलास परब व मतीन शेख, विशाल मराठे,गणेश जामोदे व सागर शिरसाठ यांनी मुंबई नाका परिसरातील वासन आय केअर नजीकच्या माधव पार्क येथे ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी सुरु केली.

फिर्यादी खैरनार यांनी १ जानेवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१७ अशी दरमहा २५ हजार रुपये रोख व धनादेशाद्वारे कंपनीत गुंतवणूक केली. कंपनीतील गुंतवणूक साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहचल्याने त्यांनी व्याज तसेच गुंतवणुकीची रक्कम परत मिळावी यासाठी कंपनीकडे संपर्क साधला . सुरुवातीला टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. पुढे जाऊन कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून मुदतीच्या नावावर टोलवाटोलवी करण्यात आली . पुढे मग खैरनार यांनी संचालकांशी संपर्क केला असता लवकरच तुमचे पैसे दिले जातील असे आश्वासन देण्यात आले. मात्र एके दिवशी संचालकांच्या सहित सर्वजण फरार झाले. मग खैरनार यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.

जास्त व्याजदर किंवा दुप्पट पैसे करून देण्याच्या अमिषाला लोक सहज बळी पडतात हे लक्षात घेऊनच अशा चिटफंडच्या नावाखाली फसवणूक केली जाते . आपण सतर्क राहणे हेच आपल्या हातात आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply