अंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही

By | October 13, 2017

bharniyaman diwali maharashtra

मधले काही दिवस महाराष्ट्र भारनियमनाच्या त्रस्त झाला होता. पाऊस आणि त्यात लाईट नाही अशीच काय ती स्थिती होती. मात्र दिवाळीत भारनियमन होणार नसल्याची ग्वाही ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली.

महाराष्ट्रात मध्यंतरी झालेले भारनियमन हे तात्पुरत होतं, अचानक उद्धभवलेल्या नैसर्गिक संकटामुळे कोळशाची टंचाई होती आणि त्याचा वीज निर्मितीवर प्रभाव पडल्याने हे भारनियमन करावे लागले होते , मात्र आत्ता परिस्थिती पुर्णत: नियंत्रणात आली असून दिवाळीत भारनियमन होणार नाही, अशी माहिती राज्याचे ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली.

एमसीएल आणि एसईसीएल या कंपनीच्या कोळश्याच्या खाणी जिथे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे कोळशाची टंचाई निर्माण झाली . रोज 28 रॅक्स कोळस्याची गरज असतांना केवळ 14 ते 15 रॅक्स कोळसा मिळत होता. मात्र आता सर्व नियमित झालेले असून कोळशाचा पुरवठा वाढू लागला आहे. त्यामुळे वीज केंद्रांना आवश्यक असलेल्या 21 दिवसांचा कोळसा साठा करण्यावर भर असून येत्या दिवाळीत भारनियमन होणार नाही असेही ते म्हणाले .

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील भारनियमन बंद आहे आणि पुढेही ते बंदच राहणार आहे. एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे स्थानिक वीजपुरवठा खंडीत झाला तरी लोक भारनियम सुरु असल्याचे समजतात. अंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे, यासाठी ग्राहकांनी वीजपुरवठा खंडीत झाल्यास आधी त्याची तक्रार महावितरणच्या स्थानिक अभियंत्याकडे करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केले.

मात्र तसेही दिवाळीत बहुतांश कंपन्या बंद असतात त्यामुळे दिवाळीत भारनियमन करण्याची वेळ येईल असे वाटत नाही . मात्र दिवाळी नंतर काय परिस्थिती असेल यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply