फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे

By | October 30, 2017

nitesh rane condems attack on manse sushant malwade appeals to come together for marathi people

मुंबईच्या फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो आणि त्यांचे घर चालते म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे . सर्वधर्मसमभावाची काँग्रेसची शिकवण निरूपम यांना बहुतेक मान्य नसावी म्हणून त्यांनी त्यांनी मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय मंच करून टाकलेला आहे. अशा शब्दात काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांना फटकारले आहे.

फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांची नितेश राणे यांनी कांदिवली येथील रुग्णालयात भेट घेतली. या भेटीनंतर ते बोलत होते . राणे म्हणाले की, मराठी माणूस म्हणून मी आज इथे आलो आहे.एखादा अनधिकृत फेरीवाला मराठी माणसाला मारहाण करतो, ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मुंबईतील दुसऱ्या भाषिक गटांवर असा हल्ला झालया ते एकत्र येतात. मराठी माणसावरील या हल्ल्यानंतर मराठी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.

संजय निरूपम यांची चिथावणीखोर भाषा ही काँग्रेसची नाही .संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेसला उत्तर भारतीय मंच बनवून टाकले आहे. मुंबई काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस उत्तर भारतीयांचा पक्ष बनत चालला आहे. काँग्रेसला मराठी माणसाची मते चालतात; पण मराठी माणूस चालत नाही, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर देखील आगपाखड केली.
फेरीवाल्यांवरून एवढे वादंग माजलेले असतात शिवसेना अद्याप शांत आहे आणि शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देखील आलेली नाही, यासंदर्भात राणे म्हणाले, मराठी माणसाचा कैवार घेणारी शिवसेना बाळासाहेबांसोबतच संपली.उर्वरित शिवसेना ही फक्त इनकमिंगवाली शिवसेना आहे. जिथून इनकमिंग असते, तिथे हे सलाम ठोकतात, म्हणूनच मुंबईत शिवसेनेची पिछेहाट होत आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते . मनसे कार्यकर्त्यांनी देखील फेरीवाल्यांचे मारहाण केल्याचे प्रकार घडले होते . फेरीवाल्यांचा माल देखील रस्त्यावर फेकून देण्यात आला होता . राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं.पुढे .शेवटी संजय निरुपम यांच्या विखारी भाषणाने फेरीवाल्यांमध्ये हवा भरण्याचे काम केले आणि फेरीवाल्यांकडून मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला . आता नितेश राणे हे हे देखील पक्ष आणि जात याच्या पुढे जाऊन मराठी माणसाच्या सोबत उभे राहिल्याने मराठी माणसांच्या एकीचे एक चांगले उदाहरण लोकांच्या पुढे उभे राहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . मात्र ह्यावेळी देखील शिवसेनेचे मौन बुचकळ्यात टाकणारे आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?