मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही : काँग्रेसचे ‘ हे ‘ आमदार

By | October 29, 2017

nitesh raane condems attack on marathi people my feriwala in mumbai

मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. आता याचे प्रत्युत्तर देनायची मनसेची भाषा आहे. मात्र आता मनसेच्या या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची साथ मिळाली आहे.

काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे हेसुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. एका मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना,”, असे म्हणत नितेश राणेंनी मराठी माणसाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे . मुंबई काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस उत्तर भारतीयांचा पक्ष होत चाललाय. काँग्रेसला मराठी माणसाची मते चालतात, पण मराठी माणूस मात्र चालत नाही, अशा शब्दात संजय निरुपम यांनाही फटकारले आहे

सुशांत माळवदे हल्ला होण्याआधी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये झाली होती . त्या सभेत संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. याचे गंभीर परिणाम आता मुंबईभर पहायला मिळतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला आहे.

मालाड पश्चिम येथील सभेत संजय निरुपम म्हणाले होते कि , ‘फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन, फडणवीस सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा. जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल’.

ह्या सभेनंतरच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे , संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, शेवटी वैतागून फेरीवाल्यांनी हल्ला केला. मनसेने गुंडागर्दी सुरु केली आहे, मनसेने कायदा हातात घेतल्यानेच असे प्रकार होत असल्याचे संजय निरुपम यांचे म्हणणे आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते . मनसे कार्यकर्त्यांनी देखील फेरीवाल्यांचे मारहाण केल्याचे प्रकार घडले होते . फेरीवाल्यांचा माल देखील रस्त्यावर फेकून देण्यात आला होता . राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं.पुढे .शेवटी संजय निरुपम यांच्या विखारी भाषणाने फेरीवाल्यांमध्ये हवा भरण्याचे काम केले आणि आजची ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे संजय निरुपम हे आधी शिवसेनेत होते आणि यांना मोठे करण्यात ठाकरे कुटुंबियांचे योगदान राहिले आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

One thought on “मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही : काँग्रेसचे ‘ हे ‘ आमदार

  1. Pingback: फेरीवाला विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘ मोठा ‘ निर्णय – Marathi People

Leave a Reply