मोदी खोटारडा पंतप्रधान संघ व भाजप ह्या फॅसिस्ट प्रवृत्ती : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे

By | January 7, 2018

nikhil wagale on koregaon bhima violence speaking with viral marathi

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी कोरेगाव दंगलीसाठी कर्मठ विचारसरणीस दोष देताना भाजपवर देखील कडक शब्दात हल्ले चढवले आहेत. मराठा मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडशी मतभेद असताना देखील ज्या पद्धतीने मराठा मोर्चाचे कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडने हे पूर्ण वातावरण हाताळले व जमावाला शांत करण्याचे काम केले त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले. वायरल मराठी ह्या युट्युब चॅनेलवर ही मुलाखत उपलब्ध आहे. (https://www.youtube.com/watch?v=y5BvFXoui7A)

संघ व भाजप ह्या फॅस्टिस्ट प्रवृत्ती आहेत आणि त्यांना देश हिंदुराष्ट्राकडे घेऊन जायचा आहे मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. संघ आंबेडकर यांना देखील मानतो व गोळवलकर यांना देखील मानतो तर संघाची नक्की भूमिका काय ? ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दलित तरुण रस्त्यावर न्यायासाठी येतो तेव्हा त्याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र पाऊल मागे घेतो. जिग्नेश मेवाणी याचे देखील त्यांनी कौतुक केले मात्र एल्गार परिषदेमध्ये उमर खालिदला बोलवून एल्गार परिषदेच्या आयोजकांनी चूक केली. उमर खालिदला बोलावून भाजपला आयते हत्यार मिळाले, असे देखील ते म्हणाले.

निखिल वागळे सध्या काय करतात ? असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता.यावर उत्तर देतात ते म्हणाले, १९७७ पासून मी पत्रकारिता करीत आहे आता यापुढे विकाऊ झालेल्या मीडियासाठी माझी काम करण्याची इच्छा नाही. स्वतः पैसे उभारून स्वतःचा चॅनेल देखील सुरु करता येईल मात्र त्यासाठी खोटारडा पंतप्रधान कधी लायसेन्स देणार नाही असे सांगत त्यांनी एक जणाचे उदाहरण देखील दिले. नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत भाजप देशाला अराजकाकडे घेऊन चाललेला आहे असेही ते म्हणाले.

कोरेगावच्या हिंसाचाराबद्दल ते म्हणाले मी कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही मात्र मराठा समाजातील काही तरुणांची डोकी भडकवण्याचे काय भिडे व एकबोटे यांनी केलेले आहे . ते त्यावेळी तिथं उपस्थित नसतील देखील मात्र हे त्यांचेच काम आहे. एल्गार परिषदेबद्दल मुक्ता टिळक यांची देखील भूमिका टिळकांच्या परंपरेला साजेशी नाही असे देखील ते म्हणाले. पुढे आंतरजातीय , आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत मात्र समाजात दुही जाणीवपूर्वक वाढवण्यात येत आहे असे ते म्हणाले. कोरेगाव हिंसा व दुसऱ्या दिवशी उमटलेली प्रति क्रिया ही उस्फुर्त नव्हे तर पूर्वनियोजित होती , या पाठीमागे फॅस्टिस्ट प्रवृत्ती जबाबदार आहेत असे ते म्हणाले.

उदयनराजे भोसले यांच्याबद्दल देखील त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राजेशाही आता हद्दपार झालेली असून मी त्यांना फक्त खासदार उदयन भोसले म्हणेल. हे काय काम करतात मला माहित नाही .हा माणूस सकाळपासून शुद्धीत नसतो. शरद पवार यांनी त्यांचे कान उपटायला हवेत मात्र त्यांचे देखील हे ऐकत नाही त्यामुळे अशा गावगुंडासारख्या माणसाचे म्हणणे जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही .

मी जात, धर्म ह्या गोष्टीना कधीच फाटा दिला असून तरी देखील जेव्हा माझ्यावर ब्राह्मण असल्याचे ऐकतो त्यावेळी वाईट वाटते . सर्वच चॅनेल मध्ये मोदी, संघाच्या विचारसरणीच्या लोकांची भरती झालेली असून त्यांनी आयबीएन लोकमत, झी, एबीपी माझाचे उदाहरण देखील दिले. संभाजी भिडे यांची मुलाखत कशी घेतली ते पहा, भिडे यांचे पी आर कॅम्पेन चालले होते . हे सर्व बेजबाबदार लोक आहेत.एकबोटे व भिडे हे हिंदुत्ववादी अतिरेकी आहेत, यांना आधी तुरुंगात टाकण्याची गरज आहे असे परखड मत देखील त्यांनी मांडले.

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

.. तर हिंदूंच्या घरात देखील हाफिज सईद जन्माला येईल: प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा

--Ads--

Leave a Reply