लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

By | January 9, 2018

nikhil wagale interview spreading fake lies about issues

लेखाच्या सुरुवातीलाच मी सांगतो मी काही संघाचा कोणी माणूस नाही किंवा संघ आहे का जनसंघ किंवा इतर कोणी मला माहित नाही. निखिल वागळे ह्या पत्रकाराशी माझी कोणतीही ओळख नाही किंवा मैत्री नाही किंवा कोणतेच शत्रुत्व किंवा आकसभावही नाही. वेगळ्या विचाराचे स्वागत करावे ह्याच न्यायाने त्यांचे देखील म्हणणे देखील मी नेहमी ऐकत असतो. कोरेगाव भीमा च्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका युट्युब चॅनेल ला मुलाखत दिली आणि आपले परखड मत त्यांनी मांडले.अर्थात हे त्यांचे वैयक्तिक मत आहे तसेच मला देखील माझे मत मांडण्याचा अधिकार आहे ह्या न्यायाने निखिल वागळे यांनी बोलताना सहज कशी दिशाभूल केली, आपल्या दिशेने येणारे बाण दुसरे लोक मध्ये घालून कसे परतवले याचा हा लेखाजोखा ..

भिडे यांच्याबद्दल बोलताना ते त्यांना कर्मठ ब्राह्मण म्हणाले याचा कोणता आधार आहे ? जर केवळ संघाचे काम करतात म्हणून ते कर्मठ ठरत असतील तर राष्ट्रपती कोविंद हे राष्ट्रपती कसे काय होऊ शकले ? आपले राहते घर देखील रामनाथ कोविंद यांनी संघाला देऊन टाकले, त्यांना कर्मठपणा दिसला नाही का ? की त्यांना देखील तुम्ही हिंदुत्ववादी अतिरेकी म्हणाल का ? आणि मिरज दंगलीचे उदाहरण देऊन जर भिडे अतिरेकी ठरत असतील तर त्यावेळी भाजपचे सरकार नव्हते. त्याच वेळी त्यांना शिक्षा करायला हवी होती.

आता अटक करा अटक करा अशी किती देखील ओरड असली तरी पुरावे पोलीस यंत्रणेला जमा करावे लागतील. नाहीतर होणार काय ? पुराव्याअभावी अटक म्हणून हिंदुत्ववादी रस्त्यावर येणार, कायदा सुव्यस्थेचे १२ वाजणार आणि न्यायालयाकडून आरोपी निर्दोष व पोलिसांना समज या पलीकडे काही होणार नाही. दंगलखोरांवर कोरेगावच्या असो व इतर कुठच्याही कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे पण केवळ लोकांच्या दबावापुढे अटक करून पोलीस आपले हसे कशाला करून घेतील ?

मुलाखतीमध्ये निखिल वागळे म्हणतात संभाजी भिडे यास इतकच झाली पाहिजे व जेलमध्ये ठेवले पाहिजे. पुढे ते म्हणतात की ह्या माणसाचे ढोंगीपणाने स्वतःचे मनोहर हे नाव बदलून संभाजी केले. हे देखील १०० टक्के मान्य. आर आर पाटील एकदा म्हणाले होते कि ब्राह्मण समाजातील मुलांची नावे कधी संभाजी, शिवाजी, तुकाराम पाहिली आहेत का ? म्हणजे एका बाजूला असे देखील बोलायचे आणि दुसरीकडे नाव बदलले तर असे देखील बोलायचे हा देखील दुटप्पीपणा नव्हे का ?

उदयनराजे यांचे बद्दल बोलताना त्यांना राजे का म्हणायचे नाही याबद्दल बोलताना स्वतःचे स्पष्ट मत मांडण्यासाठी देखील त्यांनी सुरेश माने यांना मध्ये टाकले व पद्धतशीरपणे स्वतःवर येणारा बाण माने यांच्या अंगावर यावा अशी व्यवस्था केली. अर्थात राजे यांना कोणी राजे म्हणावे आणि कोणी नाही हा देखील त्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही देखील स्पष्टपणे सांगितले असते राजे म्हणू नका तरी चालले असते त्यासाठी सुरेश माने यांना मध्ये घेण्याची काही गरज नव्हती. उदयनराजे यांच्याबद्दल माहिती आपणच दिली ( हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणजे काय ? म्हणजे तुम्ही सांगता म्हणून का ? आपल्या बोलण्याला कसला आधार ते देखील सांगायला हवे होते ). कधी साताऱ्याला येऊन प्रत्यक्ष लोकांना भेटून माहिती घ्या आणि लोक काय बोलतात ते देखील सांगा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून .

ज्या मीडियावर तुम्ही टीका केली तुम्ही देखील एके काळी त्याच मीडियाचा भाग होता. म्हणजे तुमची करायचे ते सर्व रोखठोक आणि बाकीचे करतात ती बिकावू भ्रष्ट असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? ज्या घराणेशाहीवर तुम्ही टीका केलीत त्याच काँग्रेसच्या माणसाचे चॅनेल असलेल्या वाहिनीमध्ये आपण काही वर्षे घातलीत . याला काय म्हणणार ? एकतर तत्वज्ञान नाहीतर सरळ सरळ व्यावसायिकता एक काय तरी मान्य करून टाका . राहिला विषय नवीन वाहिनी आणि मोदींना दोष देण्याचा, तर नवीन वाहिनी जाऊ द्या पण इतरही कुठल्या चॅनेलवर आपले मत मांडताना आपण दिसत नाहीत. किंवा सोशल मिडीया हा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध असताना देखील आपण ऍक्टिव्ह दिसत नाहीत. यासाठी सुद्धा मोदीच जबाबदार का ?

  • संबधित बातम्या

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

जिग्नेशचे आपण कौतुक केले. जिग्नेशच्या बोलण्यातून जो इतर समाजाबद्दल द्वेष दिसतो किंवा ज्या खालच्या पातळीवर जाऊन बोललेले आहे,त्याची तुम्ही निंदा केली नाही. जिग्नेशच्या भाषणामुळे पुढे घटना घडत गेल्या हे देखील तुम्ही खोटे ठरवलेत . फुले आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आपण हिंसेचे समर्थन कसे कराल. मुक्ता टिळक यांना दोष देऊन मोकळे झालात, पण ही परिषद घेण्यासाठी आधी विरोध केला असेल मात्र नंतर दोन्ही बाजूनी बैठक घेऊन सामोपचाराने ही परिषद आयोजित करण्यात अली होती. ज्या जिग्नेशने विजय मिळवला म्हणून तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या ज्या जिग्नेशच्या मतदारसंघामधून काँग्रेस, आप यांनी उमेदवार देखील उभे केले नव्हते , म्हणून जिग्नेशला विजय मिळवणे सोपे झाले,ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी जिग्नेश मेवानीला डोक्यावर घेण्याची गरज नाही. जिग्नेश मेवानी याच्यावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ह्या संस्थेकडून फंड घेतल्याचा आरोप आहे. ही संस्था सध्या एनआयएच्या रडारवर असून हिची चौकशी चालू आहे याची आपल्याला माहिती नसावी . अरुंधती रॉय यांनी देखील जिग्नेशला निवडणुकीसाठी ३ लाखाची मदत केलेली आहे . ह्या अरुंधती रॉय यांना भारताचा काश्मीरमधील सहभाग नको आहे . यावर आपले काय मत आपण कधी व्यक्त करताना दिसला नाहीत.

भारत तेरे तुकडे होंगे असे सांगणारा उमर खालेद हा देखील जिग्नेश मेवाणी यांचा सहकारी आहे . मुलाखतीमध्ये आपण उमर खालेदला बोलवायला नको होते ते म्हणालात हे मनाला पटले. ज्या बुऱ्हाण वाणीचे हा खालेद कौतुक करतो त्याने इथे येऊन आम्हाला लोकशाही शिकवायचा काही अधिकार नाही . आपण देखील पोटतिडकीने हिंदू दहशतवादाच्या विरोधात मत मांडता तसे इतर धर्माच्या बाबतीत कधी जास्त बोलताना आढळले नाही. मुद्दाम सतत प्रवाहाच्या विरोधात बोलत राहायचे आणि प्रसिद्धी मिळवायची. जेवढे खैरलांजी बद्दल बोलता तेवढेच कोपर्डी बद्दल देखील बोलत चला. जेवढे साध्वी प्रज्ञा बद्दल बोलाल तेवढेच बुऱ्हाण वाणी याच्याबद्दल देखील बोलत चला. खैरलांजी असो व कोपर्डी गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे. ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या आड येऊन देशात सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती वेळीच ठेचून काढायला पाहिजेत त्यासाठी देखील आपल्याला आवाज उठवावा लागेल नाहीतर फुले आंबेडकर आणि शाहू महाराजांचे फक्त नाव घेऊन तद्दन खोटारडेपणा पसरवायचा आपल्याला देखील काही अधिकार नाही.

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा