परत सांगू नका बोललो नव्हतो : मनसेचे पुढील टार्गेट ‘ हे ‘ आहे

By | November 20, 2017

nigude grampanchayat manse win in kokan

मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे मध्ये मराठी पाटयांसाठी आक्रमक होत दुकानदारांना इशारावजा धमक्या दिलेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्ते कामाला लागले. मात्र मनसेचे पाटयांसाठीचे आंदोलन पुढेही सुरु राहणार असून यापुढे आता मनसेच्या रडारवर आहेत बॅंका.

सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकामध्ये मराठीचा वापर नगण्य आहे . पैसे भरण्यात येणाऱ्या स्लिप पासून तर चेक बुक पर्यंत कुठेच मराठीचे अस्तिवात आढळत नाही. मात्र मनसे बॅंकामध्ये मराठीचा वापर केला जावा यासाठी आग्रही असून, असे न केल्यास आंदोलन करू अशा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. बँकांमध्ये मराठी भाषेत व्यवहार करावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देणारे पत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील बँकांच्या कार्यालयांमध्ये दिले आहे.

वांद्रे – कुर्ला संकुलातील पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँकेसह इतर बँकांमध्ये मराठीत व्यवहार सुरू न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.अर्थात मनसेच्या ह्या इशाऱ्या नंतर बँक काय पावले उचलणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मनसेचे पुढील आंदोलन हे बँकांमध्ये मराठी भाषेच्या आग्रहासाठी असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत दिला होता. बँकांमध्ये स्थानिक भाषेतून व्यवहार व्हायला हवेत, असा आरबीआयचा नियम आहे. परंतु, आपल्याकडे सर्रास हिंदी आणि इंग्रजीतून व्यवहार होतात. बँकांच्या कामकाजात सुसूत्रता यावी म्हणून हे केले जाते असे बॅंकेच्या वतीने सांगण्यात येते.

दरम्यान , अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणारे ठाण्यातील मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बढती देत ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच, राजू पाटील आणि अभिजित पानसे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शनिवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा संपल्यावर मनसैनिकांनी घरी जाताना काही दुकानांत जाऊन इंग्रजी पाट्यांऐवजी मराठी पाट्या तातडीने लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या होत्या मात्र  पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या मनसैनिकांना घरी पाठवून दिले होते. मात्र ठाण्यात मराठी पाट्या प्रत्येक दुकानाबाहेर दिसाव्या, यासाठी मनसे लवकरच मोठी मोहीम हाती घेणार असल्याचे समजते.

‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात ?

मी मनसेचा .. पण मनसे ? : मनसे ज्यांनी सोडली ते काय बोलतात ?

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?