वा रे सेटिंग .. नयन पाटील यांचे बॅचमेट केडगावमधील : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

By | April 21, 2018

private finance suicide case balasaheb pawar ahmednagar

बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात अभय परमार यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तोडपाणी केल्याची चर्चा नगरमध्ये रंगली होती . मात्र केडगाव हत्याकांड झाले व परमार यांना निलंबित करण्यात आले यानंतर पोलीस ठाण्याचा कारभार रत्नपारखी यांच्याकडे सोपवला गेला. अद्याप देखील बाळासाहेब पवार यांना पैशासाठी त्रास दिलेल्या सर्व सावकारांची नावे उघड झालेली नाहीत. फिर्याद दाखल होऊन देखील नावे उघड न करण्याची नगरची प्रथा बहुदा जगात एकमेव ठरावी . ह्या प्रकरणात बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येचा तपास नयन पाटील ह्या नवख्या उप निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला . नयन पाटील हे प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत दाखल झालेले नवखे अधिकारी . पाटील यांचे प्रशिक्षण कालावधीतील बॅचमेट असणारे सहकारी हे केडगावचेच . आणि ह्या केडगाव मधील पाटील यांच्या मित्र अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचे कोतकर कर्डीले व जगताप यांच्याशी थेट संबंध .

सदर प्रकारामध्ये ज्यांची नावे समोर आलेली आहेत ते सर्वजण नयन पाटील यांच्या बॅचमेट मित्राच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचे वृत्त दैनिक सह्याद्री मध्ये छापून आले आहे . हे वृत्तात जर तथ्य असेल तर इथे देखील बाळासाहेब पवार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता धुरसच आहे. ह्या प्रकारांचा तपास तात्काळ पाटील यांच्याकडून काढून घेण्यात यावा आणि निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे किंवा सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी आता लोक करत आहेत.

  • काय आहे प्रकरण ?

नगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च ला गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सावकारांना पाठबळ कुणाचे ? हा प्रश्न सर्व नगरकरांना भेडसावत असून आता पोलिसांकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.पोलिसांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाचे पाळेमुळे खणून सत्य नगरकरांपर्यंत पोहचवणे अशी नगरकरांची मागणी आहे . या प्रकरणात सावकाराशिवाय आणखीही काही लोकांचा सहभाग आहे का ? असल्यास त्यांची नावे अजूनही कोणाला कशी माहित नाहीत ? अशी नगरमध्ये चर्चा आहे . पोलीस देखील ह्या तपासाबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगून असून गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील तपासी अधिकाऱ्याने आरोपींची नावे जाहीर करणे टाळलेले आहे. त्यांचे हे मौन नगरकरांना बुचकळ्यात टाकणारे आहे .

पवार यांनी उद्योगासाठी खासगी सावकार तसेच बँक व पतसंस्था यांचेकडून कर्ज घेतले होते . नगरमधील नवनाथ वाघ, यशवंत कदम , विनायक रणसिंग, कटारिया जीजी या चार सावकारांकडून त्यांनी काही कोटीचे कर्ज घेतले होते,असे त्यांची मुलगी अमृता पवार यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये म्हटले आहे. या सावकारांकडून पैशासाठी तगादा सुरु होता तसेच व्यवसायातून जमा होणारी रक्कम सुमारे साडेतीन लाख ही व्याजाचे पैसे देण्यातच जात होती. या तणावामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे अमृता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे .

मात्र पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद राहिलेली असून, आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीस ,नवनाथ वाघ यालाच अटक करण्यात आलेली आहे . इतर आरोपी पोलिसांना देखील मिळू नयेत ? हा एक प्रश्न आहे . पवार यांच्या सुसाईड नोट मध्ये हे चार सोडून इतरदेखील नावे असल्याची चर्चा आहे, मात्र हे ‘इतर ‘ कोण याची माहिती पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात आलेली आहे . त्याचा तपशील पोलिसांनी जाहीर केलेला नाही. पवार यांचा राजकीय क्षेत्रात देखील मोठा दबदबा होता. राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्तींसोबत त्यांची उठबस होती त्यामुळे ते या सावकाराना का घाबरत होते ? या सावकारांच्या आडून काही बडी मंडळी त्यांना छळत असल्याची देखील शंका आहे. मात्र पवार यांचे निकटवर्तीय , मित्र तसेच राजकारणी देखील मौन बाळगून आहेत त्यामुळे ह्या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे .

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

राष्ट्रवादी आमदार पोलिसांच्या ताब्यात तर भाजप आमदारावर देखील गुन्हा : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या : काँग्रेसच्या नेत्याच्या दहशतीमुळे मृतदेह रस्त्यावर पडून

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील काय ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा