आता आरोपी बोलणार पोपटासारखे .. नगर पोलिसांनी घेतला ‘ हा ‘ निर्णय : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

By | April 21, 2018

ravi khollam arrested in kedgaon double murder case

केडगाव येथे दोघा शिवसैनिकांचे हत्याकांड करणारा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ याच्यासह संदीप गिर्हे व महावीर मोकळे यांची नार्को टेस्ट घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे . आरोपींच्या विसंगत जबाबामुळे घटनास्थळी काय घडले हे अद्याप देखील समोर आलेले नाही. ह्या घटनेतील केंद्रस्थानी राहिलेला व ज्याच्या सांगण्यावरून ही हत्या झाली , असा विशाल कोतकर याला पकडण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. विशाल कोतकर याला पकडल्यानंतर इतर सहभागी आरोपींची नावे स्पष्ट होणार आहेत.

केडगाव इथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून भर चौकात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील आरोपी संदीप गुंजाळ हा स्वतःहुन पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता व त्याने गुन्हा मी केला असे कबुल केले होते . या निवडणुकीतील काँग्रेसचे विजयी उमेदवार विशाल कोतकर यांच्या सांगण्यावरून आम्ही ही हत्या केली असे गुंजाळने याआधीच पोलिसांना सांगितले होते .मात्र गुंजाळ हा फक्त मोहरा असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे म्हणणे आहे.ही घटना अनेक जणांनी पहिली असल्याची देखील शक्यता आहे मात्र स्थानिक काँग्रेस नेत्याच्या दहशतीमुळे लोक पुढे येत नाहीत. घटनास्थळाचे वास्तव समजून घेण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शीच्या शोधात आहेत . केडगाव दुहेरी हत्याकांडाप्रकारानी कोणी पोलिसांना माहिती दिल्यास त्याला १ लाखाचे बक्षीस देखील जाहीर केले आहे शिवाय त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा या भेटून किंवा मोबाईल नंबर वर फोन करून देखील माहिती असल्यास दयावी असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .

  • वसंत ठुबे यांना कोणी मारले ?

संजय कोतकर व वसंत ठुबे हे रवी खोल्लमच्या घराच्या दिशेने आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या संदीप गुंजाळ व कोतकर यांच्यात वाद झाला. यावेळी राग अनावर झाल्याने गुंजाळने कोतकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना पाहून तेथे उपस्थित असलेले ठुबे पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून हत्या करण्यात आली . ही हत्या गुंजाळ याने केली कि, संदीप गिर्हे याने हे अद्यापही समोर आलेले नाही. गुंजाळ हा गिर्हे याने हत्या केल्याचे सांगत आहे तर गिर्हे हा दोन्ही हत्या गुंजाळ यानेच केल्याचे सांगत आहे .असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले ? शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा