उद्धवने तोंड बंद न केल्यास ‘ त्या ‘ सगळ्या घटना मी उघड्या केल्याशिवाय राहणार नाही: नारायण राणे

By | December 9, 2017

narayan rane warns uddhav thakare to be quite

मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही, उलट उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांना त्रास दिला होता .. जर त्यांनी तोंड बंद केलं नाही, तर उद्धवने घरात बाळासाहेबांना काय त्रास दिला, याची सगळी गुपिते भविष्यात उघडकीस आणणार अशी धमकीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

नारायण राणे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी सांगली इथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करण्याऐवजी विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम करावे. उद्धवला राजकारणाचा गंध नाही. केंव्हा काय बोलावे हे कळत नाही. अठरा मिनिटांच्यावर याचे भाषण जातच नाही, १६ मिनिटं टीका करणे आणि ३ मिनिट गोंजारणे इतकंच त्यांना जमते. मी बाळासाहेबांना सांगून पक्ष सोडला तो देखील उद्धवमुळे . बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. मी मंत्री होऊ नये म्हणून बाळासाहेबांना मी त्रास दिला असे ते सांगत आहेत. मात्र बाळासाहेब हयात असताना त्यांना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरे व त्यांचा कुटुंबीयांनी दिला आहे . त्यांनी आता तोंड बंद ठेवावे नाहीतर साहेबाना मुलगा म्हणून दुःख पोहचवण्याचे केलेले सर्व प्रकार आणि घटना बाहेर आणीन, अशी धमकी देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली.

माझा विश्वासघात कोण करेल असे वाटत नाही. मला जो विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तो विश्वास मुख्यमंत्री पूर्ण करतील. मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात आणि देशात काँग्रेस पक्षाची दशा दिशाहीन झाली आहे. सध्या गुजरात निवडणुकीत चुरस दिसत असली तरी तिथे भाजपच विजयी होणार असल्याचे देखील राणे म्हणाले.

राणे यांनी काही दिवसापूर्वीच आपला स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत . नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना देखील आपण शिवसेना केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सोडत असल्याचे जाहीर केले होते. नारायण राणे यांना लवकरच मंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र राणे यांना मंत्रिपद मिळू नये अशी शिवसेनेची इच्छा आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व नारायण राणे यांच्यात हल्ले प्रतिहल्ले वाढत आहेत.

अशा पद्धतीने नारायण राणे यांना घेरतेय शिवसेना

१) वैभव नाईक

स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच असून नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोणतेही भवितव्य नाही. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली होती.

गेली २५ वर्षे नारायण राणे यांना मी ओळखतो. त्यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील घटनांवरून दिसून येते. राणेंइतकी लाचारी कोकणातील दुस-या कोणत्याही नेत्यामध्ये नाही. कोकणात अनेक मोठे नेते होऊन गेले. राणे इतका लाचार दुसरा नेता पाहिला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना कोकणचे नेते म्हणून म्हणून मुख्यमंत्री केले. पण पुढे जाऊन राणे शिवसेनेवर उलटले. ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला लागले. उध्दव ठाकरे यांनी ठरवले तरच राणे आमदार किंवा मंत्री होतील. शिवसेनेशिवाय ते मंत्री होऊच शकत नाहीत. शिवसेनेचे २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे राणे सांगत आहेत. शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही आणि कुणीही त्यांच्या सोबत जाणार नाही. राणे यांनी लाचारी गहाण ठेवलेली आहे. स्वार्थासाठी ते कुणाबरोबरही लाचार होतील.कणकवली बंद ठेवायला नारायण राणे यांचा विरोध होता तरीही कणकवलीवासीयांनी कणकवली बंद ठेवून प्रशासनाचा विरोध केला. नारायण राणे यांना कणकवलीवासीयांनी किंमत दिली नाही, असे वैभव नाईक पत्रकार परिषद घेऊन राणे यांच्याबद्दल कणकवली येथे बोलले होते.

२) दीपक केसरकर

तर शिवसेनेचे दुसरे नेते दीपक केसरकर हे देखील राणे यांचे कोकणातील प्रबळ विरोधक मानले जातात. त्यांनी देखील यापूर्वी कित्येक वेळा राणे परिवारावर आरोप केले आहेत. नारायण राणे यांची ‘ईडी’तर्फे चौकशी सुरू असल्याचे दीपक केसरकर यापूर्वी म्हणाले होते .

मात्र ह्या आरोपात काही तथ्य नसून, केसरकर यांनी ज्या न्यायालयात दावा आहे, तेथील पुरावे द्यावेत; अन्यथा आमची बदनामी थांबवावी. तसे न झाल्यास आम्हाला कायदेशीर नोटीस द्यावी लागेल, असा इशारा देखील आमदार नीतेश राणे यांनी केसरकरांना यापूर्वीच दिला आहे.

नितीश राणे यांनी केसरकर यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले होते , केसरकर यांना ईश्‍वरी संकेत समजतात, त्यांनी आपल्या पक्षातील शिवसैनिकांच्या भल्यासाठी तरी काही करावे. जिल्ह्यासाठी २७०० कोटी आणले सांगता,मग निधी गेला कोठे? रस्त्यांची दुरवस्था का आहे? प्रशासनावर तुमचा वचक राहिला नाही, हे जनतेला कळले आहे. केवळ राणेंवर बोलायचे आणि वेळ मारून न्यायची ही पद्धत आहे.केसरकर यांनी आमच्या घरात डोकावण्यापेक्षा जिल्ह्याच्या नियोजनातील निधीला कात्री कशी लागली,याकडे लक्ष द्यावे.

राणे मंत्री होऊ नयेत म्हणून शिवसेनेचे आटोकाट प्रयन्त सुरु आहेत आणि त्यासाठी राणेंवर टीका करून त्यांना एकाकी पाडण्याचे प्रयन्त शिवसेनेकडून सुरु आहेत . राणे भाजप मध्ये जाऊ नयेत म्हणून देखील शिवसेना आग्रही होती मात्र, राणे यांनी देखील भाजपचा रस्ता न धरता स्वतः चा पक्ष काढल्याने आता जर राणे मंत्री झाले तर शिवसेनचा विरोध हा निरुपयोगीच ठरला असे म्हणावे लागेल.

आता खूप झालं … नारायण राणेंनी आक्रमक होत उचलल ‘ हे ‘ पाऊल

आता बस्स.. केसरकरांनी बदनामी न थांबवल्यास कायदेशीर नोटीस पाठवू : नितेश राणे

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवल्याबद्दल ‘ यांनी ‘ केले फडणवीस यांचे अभिनंदन

फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे

नारायण राणेंची उत्पत्तीच मुळात गुंडगिरीतून..राणे यांच्यावर हल्लाबोल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?