नगरच्या कोतवाली पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

By | April 21, 2018

private finance suicide case balasaheb pawar ahmednagar

बाळासाहेब पवार यांनी सुसाईड नोट मध्ये चार सावकारांची नावे स्पष्टपणे पहिल्या पानावरच होती . याचे पैसे घेतले आणि त्याचे पैसे दिले,असे पवार यांनी यात स्पष्टपणे म्हटले होते , तसेच त्यांनी आता माझ्या आत्महत्येनंतर कुटुंबाला त्रास दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही पवार यांनी त्यात म्हटले होते . चौकशी चालू आहे ह्या गोंडस नावाखाली अभय परमार यांनी ह्या कुटुंबास अक्षरश: झुलवत ठेवले.

पवार यांचा दहावा-तेरावा होईपर्यंत आणि कोणी पुढे येऊन फिर्याद देईपर्यंत कोतवालाच्या पोलिसांनी ह्या चारही सावकारांना मोकळे सोडले . आज फक्त एक सावकार पोलिसांच्या ताब्यात असून बाकीचे फरार आहेत . या कालावधीत ह्या सर्व सावकारांनी आणि त्यांच्या पाठिराख्यांनी त्यांच्याकडील सर्व स्टॅम्प, कागदपत्रे नष्ट केली नसतील असे कशावरून ? गुन्हा दाखल झाला आणि मग तरुण तडफदार अशी टीम ह्या सावकाराना शोधायला निघाली. मात्र एकमेव नवनाथ वाघ हाच हाती आला बाकीचे अद्याप देखील फरार आहेत . नवनाथ वाघ यालाच बळीचा बकरा बनवायचे नियोजन आधीपासून केले होते का ? फक्त एकच सावकार का सापडला बाकीचे पोलिसांना मिळू नयेत अशी परिस्थिती खरोखरच आहे का ? . जर पवार यांच्या आत्महत्येच्या दिवशी ह्या चारही सावकाराना ताब्यात घेतले असते तर ह्या केसचे सगळे पत्ते खुलले असते .अद्याप देखील बाळासाहेब पवार यांना पैशासाठी त्रास दिलेल्या सर्व सावकारांची नावे उघड झालेली नाहीत. फिर्याद दाखल होऊन देखील नावे उघड न करण्याची नगरची प्रथा बहुदा जगात एकमेव ठरावी .

आता कदाचित उर्वरित गुन्हेगार सापडतील देखील मात्र पुरावे नष्ट केल्यानंतर सापडून तरी काय होणार ? न्यायालयापुढे पुरावेच नसतील तर शिक्षा तरी कोणाला व कशी होणार ? तसे पाहता अभय परमार यांनीच दिरंगाई केल्याचे ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार ? केडगाव हत्याकांडानंतर ते आधीच निलंबित आहेत याही पुढे जाऊन त्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का ? हे येत्या काळात स्पष्ट होईल मात्र नगरचा बिहार झालाय हे मात्र नक्की .

बाळासाहेब पवार याच्या आत्महत्या प्रकारांचा तपास करणारे नयन पाटील यांचे बॅचमेट देखील केडगावचे असल्याचे आणि ह्या बॅचमेटचे ह्या प्रकरणात नावे आलेल्या व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. एकंदरीत बाळासाहेब पवार यांना मृत्यूनंतर देखील न्याय मिळण्याची शक्यता धुरस आहे . एकीकडे पारदर्शीपणाचे डांगोरे पिटणारे देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर नगरमध्ये लक्ष घालून नगर दहशतमुक्त करावे अशी सर्वांची इच्छा आहे .

  • काय आहे प्रकरण ?

नगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च ला गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सावकारांना पाठबळ कुणाचे ? हा प्रश्न सर्व नगरकरांना भेडसावत असून आता पोलिसांकडून नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.पोलिसांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाचे पाळेमुळे खणून सत्य नगरकरांपर्यंत पोहचवणे अशी नगरकरांची मागणी आहे . या प्रकरणात सावकाराशिवाय आणखीही काही लोकांचा सहभाग आहे का ? असल्यास त्यांची नावे अजूनही कोणाला कशी माहित नाहीत ? अशी नगरमध्ये चर्चा आहे . पोलीस देखील ह्या तपासाबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगून असून गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील तपासी अधिकाऱ्याने आरोपींची नावे जाहीर करणे टाळलेले आहे. त्यांचे हे मौन नगरकरांना बुचकळ्यात टाकणारे आहे .

पवार यांनी उद्योगासाठी खासगी सावकार तसेच बँक व पतसंस्था यांचेकडून कर्ज घेतले होते . नगरमधील नवनाथ वाघ, यशवंत कदम , विनायक रणसिंग, कटारिया जीजी या चार सावकारांकडून त्यांनी काही कोटीचे कर्ज घेतले होते,असे त्यांची मुलगी अमृता पवार यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये म्हटले आहे. या सावकारांकडून पैशासाठी तगादा सुरु होता तसेच व्यवसायातून जमा होणारी रक्कम सुमारे साडेतीन लाख ही व्याजाचे पैसे देण्यातच जात होती. या तणावामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे अमृता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे .

मात्र पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद राहिलेली असून, आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीस ,नवनाथ वाघ यालाच अटक करण्यात आलेली आहे . इतर आरोपी पोलिसांना देखील मिळू नयेत ? हा एक प्रश्न आहे . पवार यांच्या सुसाईड नोट मध्ये हे चार सोडून इतरदेखील नावे असल्याची चर्चा आहे, मात्र हे ‘इतर ‘ कोण याची माहिती पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात आलेली आहे . त्याचा तपशील पोलिसांनी जाहीर केलेला नाही. पवार यांचा राजकीय क्षेत्रात देखील मोठा दबदबा होता. राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्तींसोबत त्यांची उठबस होती त्यामुळे ते या सावकाराना का घाबरत होते ? या सावकारांच्या आडून काही बडी मंडळी त्यांना छळत असल्याची देखील शंका आहे. मात्र पवार यांचे निकटवर्तीय , मित्र तसेच राजकारणी देखील मौन बाळगून आहेत त्यामुळे ह्या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे .

वा रे सेटिंग .. नयन पाटील यांचे बॅचमेट केडगावमधील : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

राष्ट्रवादी आमदार पोलिसांच्या ताब्यात तर भाजप आमदारावर देखील गुन्हा : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या : काँग्रेसच्या नेत्याच्या दहशतीमुळे मृतदेह रस्त्यावर पडून

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील काय ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा