(सत्यकथा ) रोहिंग्या मुस्लिमांची निर्दयता: रांगेत उभं करुन हिंदूंची हत्या आणि इस्लामसाठी सक्ती

By | September 26, 2017

म्यानमारमधून जीव मुठीत धरून बाहेर पडल्यानंतर तेथील काही रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आसरा घेतला आहे. ह्या रोहिंग्यांमध्ये काही हिंदू आणि मुस्लिम रोहिंग्याचा समावेश असला तरी मुस्लिम रोहिंग्यांच्या संख्येपेक्षा हिंदू रोहिंग्यांची संख्या खूप कमी आहे .त्यामुळे बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदू रोहिंग्यांना मुस्लिम रोहिंग्यांकडून प्रचंड अत्याचार सहन करावा लागत असून हिंदू रोहिंग्या सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत.

हिंदू रोहिंग्या महिलेने आपल्याला सामोरं जावं लागलेलं वास्तव जगापुढं मांडलय . त्यात कुंकू काढण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. इतकंच नाही तर तिला आणि तिच्यासोबत असणा-या महिलांना बांगड्या फोडण्यास सांगण्यात आलं आणि पुजा नाव बदलून राबिया असं नाव ठेवण्यात आलं .

मेल टुडेने दिलेल्या वृत्तानुसार,. म्यानमारमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात पूजा यांनी आपला पती गमावला. मात्र,लष्कराने त्यांच्या पतीला ठार केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोक चेह-यावर काळा कपडा बांधून आले होते, ज्यांनी धर्माच्या नावाखाली अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. पूजा यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पती आणि कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बंदिस्त ठेवण्यासाठी पूजा यांना जिवंत ठेवण्यात आलं होतं.

त्यानंतरही दुर्दैव पाठ सोडायला तयार नव्हतं . ‘त्यांनी आम्हाला एका जंगलात नेलं आणि नमाज वाचायला सांगितलं. तसं केल तरच सुटका केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. कुंकू पुसायला सांगितलं, बांगड्या फोडायला सांगितल्या आणि जबरदस्तीने बुरखा घालण्यासाठी सांगण्यात आलं. तीन आठवडे त्यांच्यासोबत राहून जबरदस्तीने मुस्लिम धर्माची शिकवण तसेच नमाज वाचण्याचीही जबरदस्ती करण्यात आली. माझ्या ओळखीच्या काही लोकांनी माझा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा मी मुस्लिम कॅम्पमध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली’, असं पूजा यांचं म्हणणं आहे.

सध्या पूजा यांच्याकडे फक्त एक लाल रंगाची साडी असून त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाला अंगावर घालण्यासाठी एक कपडादेखील शिल्लक नाही. बांगलादेशमधील बाझार जिल्ह्यात असलेल्या हिंदू रोहिंग्या कॅम्पमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना थोड्या फार फरकाने अशाच वस्तुस्तिथीला समोर जावं लागलेलं आहे .

दुसरी सत्यकथा आहे रिका यांची, रिका यांना जबरदस्तीने सादिया बनवण्यात आलं. ’25 ऑगस्ट रोजी ते सर्व हिंदू परिसरात घुसले. सर्वात आधी मोबाइल हिसकावून घेण्यात आले आणि नंतर पुरुषांना बांधून जनावरांप्रमाणे मारहाण करण्यात आली. माझे पती सोनार होते, त्यांनी माझे सर्व दागिने लुटले आणि मारहाण केली. सर्व हिंदूंची ओळख पटवण्यात आली आणि जवळच्या डोंगरावर नेण्यात आलं. नंतर रांगेत उभे करून सर्वांची हत्या करण्यात आली. फक्त आठ महिला त्यातली त्यात ज्या सुंदर होत्या त्यांना जिवंत ठेवण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, तुम्हाला मुस्लिम धर्म स्विकारावा लागेल आणि आमच्याशी लग्न करावा लागेल. नाहीतर मारून टाकलं जाईल. आम्हाला आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. आम्हाला जंगलात नेण्यात आलं. उपाशी ठेवून अन्नाचा कण हि दिला जात नसे. यानंतर आम्हाला बांगलादेशला आणलं. आमच्या काही हिंदू नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर ते आम्हाला परत घेऊन आले’, असं रिका यांनी सांगितलं आहे.

म्यानमारचे सरकार आणि तेथील लष्कराने रोहिंग्या मुस्लिमांच्या बाबतीत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे रोहिंग्यांना आता पळता भुई थोडी झाली आहे . आणि हे निर्दयी रोहिंग्या भारत ,नेपाळ ,बांगलादेश इथे लपून छपून देखील काही प्रमाणात येत आहेत.
रोहिंग्यांचा इतिहास पाहता , रोहिंग्या मुस्लिमांना भारतात दयामाया दाखविली जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे. मात्र काही मुस्लिम संघटना मात्र हे सगळे विचारात न घेता केवळ मतावर डोळा ठेवून रोहिंग्यांचे समर्थन करत आहेत.

( Image & Story Credits : http://www.dailymail.co.uk )

@@पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा @@