एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

By | December 6, 2017

muslim priest cheated one family in pune blackmagic issue

पुण्यातील कोंढवा भागातील एका कुटुंबातील सासू व सुनेचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपाखाली एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे . ह्या भोंदूबाबाचे नाव हैदरअली रशीद शेख ( वय- 47, रा. कसबा हाईट्स, गुरूवार पेठ, सातारा) असून हा मूळचा सातारचा आहे. सध्या हा बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. ह्या भोंदूबाबाने संबधित कुटुंबातील सासू व सुनेचे नैसर्गिक व अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक, शारीरिक शोषण केलेच पण त्यांच्याकडून आठ लाख रूपयांची रोख रक्कम, चार कार तसेच सातारा येथील एक जमिनीचा प्लॉटही बळकविल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.यासंदर्भात पीडित महिलेने पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

काय आहे प्रकरण ?

पीडित कुटुंबिय हे मूळचे सातारा येथील रहिवासी असून काम धंद्याच्या निमित्ताने ते पुण्यातील मोमीनपुरा भागात राहतात. संबंधित महिलेचा पती हा इंजिनीअर असून मुकुंदनगर परिसरात त्यांचे ऑफिस आहे. मूळ गाव सातारचे असल्याने त्यांचे साताऱ्याला जाणे येणे होते याचवेळी साताऱ्यामधील ह्या बाबाच्या हे कुटुंबीय संपर्कात आले. आपण करणी, भूतबाधा व वेगवेगळे आजार दैवीशक्तीने बरे करतो असे लोकांना सांगून हा बाबा परिचय वाढवायचा आणि पुढे आर्थिक व लैंगिक छळ सुरु करायचा.

संबंधित पीडित महिला काही कारणाने यावेळी आजारी होती. मात्र हे आजारपण हे करणी केल्यानेच झाले आहे असे सांगून शेखने काही उपचार सुरु केले .सोबत वैद्यकीय उपचार देखील सुरु होते त्यामुळे ती महिला बरी झाली मात्र त्यात मध्ये शेखने हे आपल्यामुळेच झाले आहे असे पटवून देत घरात एन्ट्री मिळवली. मात्र, महिलेचा आजार बरा झाल्याने या कुटुंबियांचा आरोपी शेख याच्यावर विश्वास बसला आणि यापुढे हे कुटुंबीय १०० टक्के त्यांच्या आहारी गेले. कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीत हा शेख सांगेल ती पूर्वदिशा असे झाले.

कुटुंब साधन असल्याचा शेख यानेदेखील पुरेपूर फायदा उठवला. याही पुढे जाऊन शेखने तुम्हाला व्यवसायातही भरभराट होईल असे सांगितले व काही उपाय करावे लागतील असे सांगून आठ लाख रूपये उकळले. दरम्यान इंजिनियर पतीच्या व्यवसायात भरभराट होत होती . मात्र, हे माझ्यामुळेच झाल्याचे सांगत त्याने त्यांच्याकडून टाटा सुमो, तवेरा, स्कोडा आणि एक सॅन्ट्रो कार अशा तब्बल चार गाड्या भेट घेतल्या. गाड्यांचे पैसे पीडित कुटुंबीय देत होते आणि गाड्या शेख आपल्या नावावर करत होता . सातारा येथे एक जमिनीचा प्लॉटही त्यांच्याच पैशाने खरेदी करून स्वत:च्या नावावर केला. पुढे पुढे तर तो पीडित महिलेच्या पतीच्या ऑफिसमध्येच बसू लागला.

दरम्यान , पीडित महिलेला आजारातून बरे केल्याचे सांगत तू आज फक्त माझ्यामुळेच जीवंत आहे. माझ्याकडील दैवीशक्तीमुळेच हे शक्य झाले. असे सांगत तुझ्यावर माझा हक्क आहे असे सांगून त्या महिलेच्या घरी तिचे शोषण सुरु होते. पुढे या शेखने या महिलेला व तिच्या सासूला विविध ठिकाणी नेऊन त्यांच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले. मात्र इतक्यावर देखील ह्या लिंगपिसाटाचे समाधान झाले नाही, त्याची नजर या महिलेच्या 14 वर्षाच्या मुलीवरही त्याची नजर पडली. त्याने तिच्याशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र, घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. अखेर त्याच्या वागण्याला कंटाळून पीडित महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भोंदूबाबा हैदर अली शेख याचे केवळ चौथीपर्यंत शिकलेला आहे. हा भोंदूबाबा इतर कोणताही व्यवसाय, नोकरी करत नाही. हाप्पीज असल्याचे सांगत दैवीशक्ती असल्याची बतावणी करत तो पैसे उकळण्याचे तो उद्योग करतो, अशी माहिती खडक पोलिस ठाण्यामधून देण्यात आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबाला एक अडाणी माणूस देखील धर्माच्या आणि जादूटोण्याच्या नावाखाली कसा गंडा घालू शकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ही घटना ठरू शकते . पुण्यासारख्या सुशिक्षित समजले जाणाऱ्या शहरात ही घटना घडल्याने भोंदूबाबांची दुकानगिरीला शिक्षित अशिक्षित असा काही फरक पडत नाही हे देखील यातून दिसून येते .

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?