अल्लाहचे नाव घेत घोटला पोटच्या मुलीचा गळा : धर्मांध प्रवृत्तीच्या विकृतीचा कळस

By | June 10, 2018

wife killed her own husband for boyfriend saswad pune case

सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र महिना रमझान सुरू आहे. जगातल्या प्रत्येक देशातले जवळपास दोनशे कोटी मुस्लिम रमजानमध्ये रोजे ठेवतात. सहेरी, इफ्तार, तराविह, कुरआन पठन, एतेकाफ वगैरे उपासना सर्वत्र केल्या जातात. परंतु याच रमझान महिन्यामध्ये धर्मांध बापाकडून चक्क आपल्या लेकराचं बळी घेण्याचे महापाप झालेले आहे.

रमझानच्या पवित्र महिन्यात अल्लाहला खूश करण्यासाठी एका नराधम पित्यानं चक्क स्वतःच्या मुलीचा गळा चिरला. राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवाब कुरेशी या पित्यानं रमझानच्या पवित्र शुक्रवारी चक्क चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा चिरून हत्या केली. एका कथित मौलवीनं श्रीमंत होण्यासाठी मुलीचा नरबळी देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर नवाब मुलीला मारण्याच्या प्रयत्नातच होता आणि त्यातूनच त्याने हे दुष्कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अंधश्रद्धा ही केवळ एका धर्माचाच डाग नाही हे देखील ह्या घटनेने अधोरेखित झालेले आहे .

परंतु मुलगी रिझवाना सुट्टीनिमित्त आईबरोबर मामाकडे गेल्यानं त्याची अडचण झाली होती. गुरुवारी नवाबनं पत्नीला मुलगी रिझवानाला फिरायला नेतो सांगत तेथून नेले. त्यानंतर तिला खाऊ वगैरे दिला. रात्री घरी आल्यानंतर मुलगी झोपेत असतानाच पहाटेचा पहिला नमाज अदा करून त्यानं मुलीचा गळा चिरला. या घटनेनं जोधपूरमध्ये खळबळ उडाली आहे, मुस्लिम समुदायामध्ये देखील त्या घटनेचा निषेध करण्यात येत आहे .