अकाउंटला पैसे जमा करून मतदान विकत घेण्याचा विक्रम ‘ह्या’ जिल्ह्यात

By | September 20, 2017

रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सध्या जोरात सुरु आहे. वाटेल ते करून उमेरवार आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत,त्यासाठी पैसे देऊन मते विकत घेण्याचा हा प्रकार महाराष्ट्राला तसा नवीन नाही. मात्र ह्या वेळी चक्क अकाउंट ला पैसे जमा करून मतदान आपल्या बाजूने वळवण्याचा प्रकार घडलाय बीड जिल्ह्यात.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा ग्रुप ग्रामपंचायतीमधील टकलेवाडी येथे बोली लावून ६ लाख ९५ हजार रुपयांत ५०० मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.टकलेवाडी येथील इच्छुक उमेदवार तुकाराम तळतकर यांनी ६ लाख ९५ हजार रुपये देऊन ५०० मतदान विकत घेतले असल्याची लेखी तक्रार येथील उपसरपंच अशोक खरात यांनी निवडणूक विभागाकडे पुराव्यासह केली होती.

दरम्यान चौकशीसाठी तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार अशोक भंडारे, संतोष देशमुख, मंडळाधिकारी काशीद यांच्यासह पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. चौकशीदरम्यान सात जण दोषी आढळले. या प्रकरणी येथील तुकाराम तळतकर, महादेव करांडे, कैलास टकले, मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदीप टकले या सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

५ सप्टेंबर रोजी मारुतीच्या मंदिरात सर्वाेच्च बोली लावलेली रक्कम समारंभपुर्वक समोर देण्यात आली होती. नंतर ६ सप्टेंबर रोजी मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदिप टकले यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बॅक कोळगाव येथे ६ लाख ९५ हजार रूपये एवढी रक्कम जमा केली होती. हा चौकशीतील मुख्य ठोस पुरावा ठरला. त्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी सांगितले.