किती सालापर्यंत नरेंद्र मोदी यांची एकहाती सत्ता राहणार भारतात ? : ब्लूमबर्ग मीडियाचा ताजा सर्व्हे

By | March 20, 2018

modi-lehar-continue-in-gujarat-while-congress-loosing-in-himachal-pradesh

विरोधकांनी कितीही मोर्चाबंदी केलेली असली तरी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आलेली आहे . ब्लूमबर्ग मीडिया समूहाने जगभरातल 16 देशांमध्ये एक सर्वे केला आहे. त्यामध्ये त्यांनी असा अंदाज लावला आहे की 2029 पर्यंत मोदी सत्तेत राहतील. सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर असतील असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे. एका बाजूला मोदी विरोधक एकवटत आहेत तर दुसरीकडे परस्पर टोकाची विचारसरणी असेलेले पक्ष देखील फक्त मोदींना विरोध ह्याच मुद्दयांवर एकवटलेले पाहायला मिळत आहेत.

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील एनडीए सरकारचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.ह्या चार वर्षांमध्ये नोटबंदी आणि जी.एस.टी सारखे महत्वाचे निर्णय मोदी सरकारकडून घेतले गेले.मात्र त्याचा मार्केटवर नकारात्मक असा परिणाम झाला असून सर्वच क्षेत्राला मोठ्या मंदीने ग्रासलेले आहे .अशातच पुढील वर्षी 2019 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षाने याची तयारी सुरु केली आहे, त्याचप्रमाणे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपा आपली ताकद पणाला लावणार तर विरोधक सत्ता मिळवण्यासाठी एकवटलेले पाहायला मिळत आहेत . मात्र ह्या सर्व्हेमुळे विरोधकांना देखील चिंता पडली तर नवल नाही.

सध्या मोदी सरकारला प्रत्येक प्रश्न आणि निर्णयावर घेरलं जात आहे. सध्या एनडीएचे मित्रपक्ष नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यातच नरेंद्र मोदींसाठी ही एक आनंदाची बातमी आली आहे . 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या करिष्मा एवढा मोठा आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची बरोबरी कोणताही नेता करु शकणार नाही असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ब्लूमबर्ग मीडियाच्या रिपोर्टनुसार, 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकहाती सत्ता भारतात राहणार आहे. 2014 मध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीमुळं विरोधक तुटले आहेत. मात्र लोकांमध्ये मोदी यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यांचा हा करिष्मा पाहता 2019 मध्येही मोदी सरकार सत्तेत येणार आहे. 2019 मध्ये ते सत्तेत आल्यानंतर ते 2024पर्यंत सत्तेत राहतील.

सध्याच्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळं भारताची अर्थव्यवस्था देखील वेगाने वाढल्याचे ब्लूमबर्ग मीडियाने रिपोर्टमध्ये सांगितले आहे. 2019 मध्ये मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा काही धाडसी निर्णय घेऊ शकतात असे देखील ह्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आगामी काळात त्यांच्या लोकप्रियेतमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याबळावर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडुकीतही ते विजयी होतील आणि सत्ता स्थापन करतील असा रिपोर्ट ब्लूमबर्ग मीडियाने दिला आहे.

हज यात्रेच्या सबसिडीबाबत सरकारचा क्रांतिकारी निर्णय .. एमआयएमची काय प्रतिक्रिया ?

मोदीजी लोक भाकरी खातात अल्फाबेट नाही..आता फक्त लोकांच्या घरात सीसीटीव्ही लावा : लेख नक्की वाचा

सरकारी कार्यालयाबाहेरील असंख्य धर्मा पाटील कोणी जन्माला घातले ? : लेख नक्की वाचा

धर्मा पाटील यांच्यावरील शासकीय अन्याय आणि माजोरडेपणाची कथा : आहे का भारत प्रजासत्ताक ?

धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली.. मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा