मोदींच्या हत्येचा कट, ही तर भाजपने पेरलेली अफवा : ‘ ह्या ‘ व्यक्तीचा भाजपवर आरोप

By | June 9, 2018

i sold tea not country modi answers congress in rajkot

ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होते आहे असे वाटते तेव्हा भाजपाकडूनच त्यांच्या हत्येच्या कटाची अफवा पेरली जाते असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण त्यांच्यापुढे मोदींची घसरती लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांच्यापुढे काही पर्याय उरत नाही अशा शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मोदी यांच्या जीविताला धोका असल्याच्या आरोपाची हवा काढून घेतलीय आहे.

नक्षलवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजीव गांधी यांच्या प्रमाणे हल्ला करून त्यांना ठार करण्याचा कट होता असा संशय व्यक्त झाला आहे. कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षलवादी असल्याचा संशय व्यक्त करत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडे जे साहित्य सापडले त्यावरून कम्युनिस्ट पार्टी राजकीय हत्येचा कट रचत होती असे सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात सांगितले. मात्र यावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी ही भाजपानेच पेरलेलेली बातमी आहे असा आरोप केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका आहे की नाही हे तपासावे लागेल. मात्र ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत असेही निरुपम यांनी म्हटले आहे.

राजीव गांधी यांना रोड शो दरम्यान ह्युमन बॉम्बने ठार करण्यात आले होते. तशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा कट रचला गेला होता असा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे त्यात विल्सन यांच्या घरातून हस्तगत केलेल्या एका पत्रात राजीव गांधींवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा संदर्भ आहे. तर कोरेगाव भीमा प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी थेट सीपीएमने राजकीय हत्येचा कट रचल्याचे म्हटले.

राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान असल्याचा संदर्भ लक्षात घेता व सध्याचे वातावरण बघता हा हल्ल्याचा कट नरेंद्र मोदींच्या विरोधात असू शकेल का असा संशय घ्यायला जागा आहे. अर्थात, पवार यांनी कोर्टात तशी शंका स्पष्टपणे नाव घेऊन व्यक्त केलेली नाही. पत्रामध्ये आत्मघातकी हल्ल्याचा संदर्भ असून एम-4 गन व तब्बल चार लाख गोळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. असे असले तरीही ही बातमी भाजपानेच पेरली आहे असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

नक्षलवाद्यांकडून राजीव गांधींसारखी पंतप्रधान मोदींची हत्या घडवण्याचा कट ? : काय आहे पूर्ण बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भगवाकरण करण्याचा किती हा अट्टाहास ? : दलितांमध्ये संतापाची लाट

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपकडून ‘ अशा ‘ रीतीने अपमान : आंबेडकरी जनतेत संतापाची लाट

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

अखेर नाणारच्या जमिनी गुजरात्यांनी लाटल्याचे स्पष्ट : राज ठाकरे याचा आरोप खरा ठरला

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा