जमिनीवर बसलेले राज ठाकरे पहिले का कधी ? : नाशिकमध्ये संवाद

By | November 10, 2017

mns raj thakare meets farmers of nashik to oppose samruddhi mahamarg

मनसेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून मनसेला जो धक्का बसला त्यातून मनसे सावरण्याचा प्रयन्त करत आहे . अत्यंत अनपेक्षित अशा ह्या फुटीमुळे किंगमेकर राहण्याची संधी मनसेने गमावली तर भाजपाला देखील मुंबईतून स्वतःचा महापौर बसवण्याचे स्वप्न भंग पावले. मनसेच्या नेतृत्वाबद्दल कायम सगळ्यांची तक्रार म्हणजे राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत , त्यांना कार्यकर्त्यांना समजावून घ्यायला वेळ नाही . मात्र राज ठाकरे यांनी आता याबद्दल विचार करून लोकांमध्ये मिसळणे आणि कार्यकर्त्यांना वेळ देणे सुरु केले असल्याचे त्याच्या एकंदरीत रुटीन वरून दिसते आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला संजीवनी देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु केले असून, कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मुंबईत सातपैकी सहा नगरसेवक रातोरात पळवल्यामुळे मनसेची नाचक्की झाली ती वेगळीच . अशा परिस्थितीत भविष्यकालीन परिस्थितीत असे होऊ नये , याचाच भाग म्हणून राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची भेट घेत आहेत. दरम्यान नाशिक दौ-यावर असताना राज ठाकरे यांनी थेट जमिनीवर मांडी घालत बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज ठाकरे नाशिक दौ-यावर आले असून यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गबाधित शेतक-यांची भेट घेतली. कल्याण, शहापूर, इगतपुरीचे शेतकरी यांनी शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेतली. पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यानी आपल्या जमिनी शासकीय अधिकारी वर्गाला रीतसर विकल्या आहेत व अधिकारी वर्गाने तिथून समृद्धी महामार्ग मंजूर केलेला आहे . आता सरकार जमिनीच्या नवीन खरेदीदारांना (म्हणजे अधिकारी वर्गाला ) चांगला भाव देईल ह्या आशेवर ह्या अधिकारी वर्गाने जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. म्हणून शेतकरी,अधिकारी वर्गाला रीतसर विकल्या गेलेल्या जमिनी असताना देखील समृद्धी महामार्ग या प्रकल्पावर विरोध व्यक्त करत आहेत . त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली .अर्थात सरकारने जमीन संपादनासाठी दिला जाणारा मोबदला तर अत्यल्प केला तर ह्या सगळ्या आंदोलनाची हवाच निघून जाऊ शकते. आठ महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकच्या दौ-यावर आले आहेत. राज ठाकरे यांनी चक्क जमिनीवर बसूनच कार्यकर्त्यांशी संवाद साधणं पसंद केलं.

मात्र , समृद्धी महामार्ग झाला तर विदर्भाच्या विकासाला एक नवीन वळण मिळेल , वन्य पर्यटन आणि रोजगार क्षेत्रात अशा हजारो संधी तयार होतील. एकदा दळणवळण यंत्रणा सुधारली तर नक्षलवादा सारख्या प्रश्नावर देखील काही प्रमाणात अंकुश लागू शकेल. मनसेकडून बुलेट ट्रेन ला देखील विरोध करण्यात आला आणि आता समृद्धी महामार्गाच्या प्रयत्नात देखील ख्वाडा घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विदर्भाने महाराष्ट्रात तर राहिले पाहिजे मात्र विदर्भच्या विकासाला आडमुठेपणाची ही भूमिका बरी नाही, असे बहुसंख्य मराठी जनतेचे मत आहे. अर्थात आमचा विदर्भाच्या विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला आहे असेही मनसे कडून समर्थन काही दिवसात केले जाऊ शकते .

राज ठाकरे यांची येत्या 18 नोव्हेंबरला शनिवारी ठाण्यात जाहीर सभा होणार असून यात राज ठाकरे फेरीवाल्यांसह राज्यासमोरील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करतील. अनेक ठिकाणी मनसेने फेरीवाल्यांचे सामना उलथवून लावत पिटाळून लावले. त्यामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवालाविरोधी आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीरसभा देखील ठाण्यामध्येच होणार आहे.समृद्धी महामार्ग ह्या विषयावर देखील ते बोलतील अशी अपेक्षा आहे.

फेरीवाले आणि पालिकेतील सत्ताधारी यांचे आर्थिक गणित असल्याकारणाने फेरीवाला ह्या विषयावर ठोस अशी कारवाई होत नाही . फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर एक-दोन दिवस रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा दिसला. पण आता पुन्हा पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता कुठली भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?