धक्कादायक: अल्पवयीन भिकारी मुलीवर मोबाईल शॉपी चालकाकडून सातत्याने अत्याचार

By | November 19, 2017

minor-rape-in pune sinhgad road

गरीबीमुळे भीक मागण्याची वेळ आलेल्या एक अल्पवयीन मुलीवर मोबाईल शॉपी चालवणाऱ्या तरूणाने सातत्याने अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.महाराष्ट्राला मान खाली घालावी लागावी असा हा प्रकार बीड मधील असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शेख जावेद शेख सलीम यास अटक केली आहे.

शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली) असे त्या नराधमाचे नाव असून पीडिता ही केवळ १५ वर्षांची आहे. पीडितेची आई ही काही कामधंदा नसल्याने बशिरगंज परिसरात भिक मागून पोट भरते, भीक मागतेवेळी तिच्यासोबत तिची मुलगीही असे. मुलगी मोठी असल्याने तिच्यावर ह्या भागातील जावेदची पापी नजर गेली . तिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत त्याने मागील उन्हाळ्यापासून आजपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार राहिला. पुढे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने ह्या प्रकाराला वाचा फुटली.

शहर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पीडित महिला व तिच्या आईकडे खोदून चौकशी केली. मात्र भीतीपोटी त्या जास्त बोलत नव्हत्या. मात्र पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले व संपूर्ण माहिती घेतली. यावेळी त्या मुलीने आपल्यावर जावेदने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर जावेदवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जावेदला तात्काळ बशिरगंजमध्ये ताब्यात घेतल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.

अलपवयीन मुलींना फूस लावून पळवणे किंवा त्यांच्यावर अत्याचार करणे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ही चिंतेची गोष्ट आहे . ह्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली तर असे प्रकार कमी होतील, मात्र कायद्यात पळवाटा शोधून हे नराधम सुटतात व परत नव्याने अत्याचार करायला मोकळे होतात.

यापूर्वी देखील आहे क्रूर प्रकार महाराष्ट्रात घडले आहेत, मात्र कायद्यातील पळवाटांचा आधार घेत हे नराधम सुटतात आणि परत नव्याने अशा विकृतीस सुरुवात करतात.

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

महिलांच्या केवळ तोकडे कपडे घालण्याने बलात्कार होतात , अशी पोपटपंची जर खरी मानली तर अशा कित्येक नवजात अर्भकांवर किंवा अशा लहान मुलींवर देखील अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे . पुरुषप्रधान समाजाच्या मनातली, स्त्री ही एक उपभोगाची वस्तू आहे ही मानसिकता जोवर जात नाही तोपर्यंत आपल्या देशात कोणत्याच महिला व अल्पवयीन मुलीदेखील सुरक्षीत नाही असेच म्हणावे लागेल.

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?