पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

By | October 23, 2017

minor-rape-in pune sinhgad road

आई वडिलांच्या जवळ झोपलेल्या अडीच वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिचा निर्दयी खून केल्याची घटना वडगाव खुर्द ( पुणे ) येथे उघडकीस आली .तिचा मृतदेह घराशेजारील मोकळ्या जागेत आढळून आला. श्रुती विजय शिवनगे असे ह्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे . या प्रकरणी तिचे वडील विजय शिवणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

विजय शिवनगे व त्यांच्या पत्नी विद्या शिवणगे हे कुटुंब मूळचे लातूर येथील असून ते रोजगारासाठी पुण्यात आले होते . विजय शिवनगे हे धायरी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. लगडमळा येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर ते भाड्याने राहत होते . पुण्यात येऊन त्यांना फक्त दोन महिने झाले होते. श्रुती ही त्यांची अडीच वर्षाची मुलगी असून, भाऊबीजेच्या सुट्टी असल्याने ते सर्व घरीच होते. त्या दिवशी त्यांच्या पत्नीचे मामा त्यांच्याकडे आले होते .त्यांनी शनिवारी रात्री सोबतच जेवण केले. रात्री नऊ च्या सुमारास श्रुती झोपली आणि सगळे कुटुंब रात्री ११ च्या सुमारास झोपी गेले. पावणेबाराच्या सुमारास विद्या यांना जाग आली असता , त्यांना श्रुती आढळून आली नाही म्हणून त्यांनी पतीला विचारले तर त्यांनी ती इथेच झोपली होती, असे सांगितले.

आई वडील आणि मामा तिघांनी मिळून श्रुतीचा शोध चालू केला, मात्र बराच वेळ त्यांना श्रुती न सापडल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घरच्या जवळपास शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही . रविवारी सकाळी ६ च्या सुमारास नागरिकांना घरापासून काही अंतरावर श्रुतीचा मृतदेह आढळला. मृतदेह पोलिसांनी त्याब्यात घेऊन पुढे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे . शेजारी तसेच नातेवाईकांची चौकशी चालू असून अद्याप आरोपी पोलिसांना सापडला नाही. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे . त्यादृष्टीने पुढील तपास सुरु आहे .

महिलांच्या केवळ तोकडे कपडे घालण्याने बलात्कार होतात , अशी पोपटपंची जर खरी मानली तर अशा कित्येक नवजात अर्भकांवर किंवा लहान लहान मुलींवर देखील अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे . पुरुषप्रधान समाजाच्या मनातली, स्त्री ही एक उपभोगाची वस्तू आहे ही मानसिकता जोवर जात नाही तोपर्यंत आपल्या देशात कोणत्याच महिला व अल्पवयीन मुलीदेखील सुरक्षीत नाही असेच म्हणावे लागेल.

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply