राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा, हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा

By | December 4, 2017

mim challenges raj thakare to act against feriwala in byculla

मुंबईतील फेरीवाला वादामध्ये आता एमआयएमने उडी घेतली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका केली आहे. याचबरोबर हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा असे आव्हान देखील दिले आहे . याआधीच मुंबई काँग्रेस व मनसे यामध्ये मोठा वाद चालू असून त्यात एमआयएमने आपली भूमिका मांडल्याने काँग्रेसला एक जोडीदार तयार झालाय असे म्हणावे लागेल.

मनसेची तोडफोड म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे, हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो, असं आव्हान एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

मनसेने जर भायखळ्यात तोडफोड केली तर आम्ही त्याला जशाच तसे उत्तर देऊ. जशाच तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याने ते आमच्या भागात येत नाहीत, असं वारिस पठाण म्हणाले. असं टीकास्त्रही वारिस पठाण यांनी सोडलं. राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया, अशी टीकाही पठाण यांनी केली आहे. ईद-ए-मिलाद चा कार्यक्रमासाठी ते सोलापूर येथे आले होते. त्याला प्रत्युत्तर देताना वारीस पठाण यांचे हे विधान केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे मनसेने म्हटले आहे.

आतापर्यंत २ वेळा फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकत्यांना मारहाण झाली होती. आधी मालाड तर नंतर विक्रोळीला असे २ वेळा मारहाणीचे प्रकार घडले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मला मार खाऊन येणारे कार्यकर्ते नकोत तर मार देणारे पाहिजेत अशी भूमिका मांडली होती.

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला होता . सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. काही वेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली होती . काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट संदीप देशपांडे यांनी केले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशपांडेंसह पोलिसांनी मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.दरम्यान मुंबईमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे जाळले व मनसेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. फेरीवाला विषयात आता एमआयएमने देखील उडी मारल्याने यावर मनसे काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. मात्र एमआयएम आणि काँग्रेस एका बाजूला होऊन मनसे ला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहे मात्र यातून मनसेची वोट बँक मजबूत होत आहे.

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?