महाराष्ट्राचे वीरपुत्र मिलिंद खैरनार यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

By | October 12, 2017

milind khairnar

जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले महाराष्ट्राचे वीरपुत्र मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर आज मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.खैरनार यांना चंदीगडमध्ये जवानांनी सकाळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचं ओझरला पोहोचेल, मग नंदुरबारमधील त्यांच्या मूळगावी बोराळेला रवाना होईल.

बऱ्याच ज्यांना अजून हे माहित नाही कि , मिलिंद हे मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या एनएसजी कमांडोच्या पथकात होते.मिलिंद हे डिसेंबर 2002 मध्ये हवाई दलात कमांडो म्हणून रुजू झाले होते, सध्या ते लष्कराच्या तुकडीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. मात्र जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं.

बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला होता .काश्मीरमधील बांदिपोरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये जैश ए मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, मुलगा शहिद झाला याचा अभिमान आहे असं सांगताना शहीद मिलिंद खैरनार यांचे वडील आणि भावाला अश्रू अनावर झाले. 26/11च्या मुंबई हल्ल्यावेळी एनएसजी कमांडो असलेल्या मिलिंद यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं होतं. मिलिंद खैरनार यांचे वडील धुळे जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीतून निवृत झाले आहेत. नोकरीनिमित्त त्यांचे वडीव धुळ्यात असल्याने शहीद मिलिंद यांचे शिक्षणही धुळ्यातील एस. एस. व्ही. पी. एस. विद्यालयात झाले. मिलिंद यांचे बंधू मनोज हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत.

? अशा महाराष्ट्राच्या वीरपुत्राला आपल्या पेजतर्फे शतश नमन ?

--Ads--

Leave a Reply