मिलिंद एकबोटे यांच्याबद्दल ‘ महत्वाची ‘ बातमी : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

By | March 15, 2018

milind ekbote arrested in pune at his own house in shivajinagar

कोरेगाव-भीमामधील हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने गुरूवारी (15 मार्च) रोजी हा निर्णय दिला. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप ठेवत बुधवारी (14 मार्च) मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती.

काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत चिथावणी दिल्याचा आरोप असलेले समस्त हिंदू अाघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजीनगर येथील घरातून बुधवारी दुपारी अटक केली. 1 जानेवारी रोजी शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यातून पुढे दंगल उसळली होती. भडक बातम्यांनी यात आणखी बहर पडली . या दंगलीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यात एका राहुल फटांगळे ह्या तरुणाचा दुर्दैवी मृत्युही झाला हाेता. बुधवारी सर्वाेच्च न्यायालयाने एकबाेटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला व पुढे पोलिसांकडून तात्काळ ही कारवाई करण्यात आली.

एकबाेटे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, चिथावणी, दगडफेकीस प्रवृत्त करणे, तेढ निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. एकबोटे यांनी प्रारंभी पुणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हाेता. मात्र, न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत अर्ज फेटाळून लावला हाेता. पुढे उच्च न्यायालयानेही देखील एकबोट यांचा अर्ज फेटाळला होता . दरम्यान, एकबोटे याने सर्वाेच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयानेही पोलिस चाैकशीसाठी हजर राहण्याचे अादेश दिले. पोलिसांनी शिक्रापूर पोलिस ठाणे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत पाच वेळा त्यांची चाैकशी केली. मात्र, एकबोटे चौकशीस प्रतिसाद देत नसल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्यामुळे अधिक चौकशीसाठी एकबोटे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

1 जानेवारी रोजी शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती.यात एका तरूणाचा मृत्यू झाला होता तर शेकडो जण जखमी झाले होते.सोबत प्रचंड मालमत्ता व वाहनांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी सरकारने 10 कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे.या प्रकरणात मिलिंद एकबोटेंसह संभाजी भिडेंचा सहभाग असल्याचा आरोप भारीप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा