वर्ष २०११ मध्ये यूपीए २ च्या कार्यकाळात रामदेव बाबा आंदोलन करणार होते मात्र त्याआधी विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेणे आपली चूक होती, अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात दिली.
यूपीए २ च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. रामदेव बाबा आंदोलन करणार म्हटल्यामुळे,प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे २०११ मध्ये दिल्ली विमानतळावर रामदेव बाबांना उपोषण न करण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. याबद्दल एका प्रेक्षकाने प्रणव मुखर्जी यांना प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, हा आमचा चुकीचा निर्णय होता.रामदेव बाबांनी उपोषण करण्यापूर्वीच हे प्रकरण सरकारला मिटवायचं होतं
पुढे ते म्हणाले कि , मला एका नेत्याने रामदेव बाबांशी चर्चा करून हे आंदोलन मिटवता येईल, असा सल्ला दिला होता. मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही. त्यासाठी मी काही जणांशी संपर्क साधला. त्या व्यक्तीनं मला म्हटलं की, रामदेव बाबा दिल्लीत जाऊन आपल्या अनुयायांशी चर्चा करण्यापूर्वीच आपण त्यांना भेटलं पाहिजे. ते तुमचं ऐकतील. आणि पुढे मी आणि कपिल सिब्बल रामदेव बाबांना भेटण्यास गेलो. राजकीय कारणांसाठी त्यांना भेटण्यास गेलो होतो. आम्ही आधीच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे त्रस्त होतो.
सरकारच्या अडचणीत यामुळे वाढ झाली होती. यात अजून भर म्हणून म्हणून रामदेव बाबा उपोषण करणार होते. त्यामुळं मला असं वाटलं की, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मिटवून टाकावं.मात्र माझी हिंदी चांगली नाही म्हणून मी जाणार नाही अशी माझी भूमिका होती त्यावेळी कपिल सिब्बल यांचे नाव पुढे आले. मला असे सांगण्यात आले कि कपिल सिब्बल हे दुभाषाचे काम करतील म्हणून मग मी कपिल सिब्बल यांना घेऊन गेलो. मात्र यांचा नंतर आम्हाला पश्चाताप झाला . हा माझा चुकीचा निर्णय होता. ती आमची चूक होती, हे सांगण्यास मला त्यावेळीही संकोच वाटला नाही व आताही वाटत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
रामदेव बाबा १ जून रोजी उज्जैनहून दिल्लीला पोहोचले होते. रामदेव बाबांची विदेशातील काळ्या पैशासह इतर मुद्यांवर मुखर्जी आणि सिब्बल यांच्याबरोबरील बैठक अयशस्वी ठरली होती.पुढे रामदेव बाबांचे आंदोलन सरकारने जोर जबरदस्तीने बंद पडले होते.
? पोस्ट आवडली तर लाईक करा.. शेअर करा ?