अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

By | January 17, 2018

maulana in nanded rape minor girl in madarasa

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील एका मदरशांमध्ये मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या आरोपवरून पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५१ मुलींची सुटका केली होती. असाच काहीसा प्रकार आपल्या महाराष्टरातील नांदेड इथंही घडला आहे. नांदेड मधील चुनाभट्टी भागातील अल्पवयीन असलेल्या ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून मदरशातील शिक्षक मौलाना साबेर फारुखी हा सध्या फरार झाला आहे. मात्र ह्या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून आणखी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . ह्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी आणखी काही जणांचे जवाब घेतले असून आणखी एका मुलीवर देखील ह्या मौलानांने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे , त्यामुळे ह्या मौलानांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे .

नांदेडच्या चुनाभट्टी येथील मदरशामध्ये परिसरातील गरीब मुस्लिम कुटुंबियांमधील मुली शिक्षणासाठी येतात . हा मौलाना त्यांना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्यावर बलात्कार करत असे. तक्रारदार महिला व तिचा पती ही माजलगाव तालुक्यातील असल्याचे समजते . मौलानाने ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला तर तिच्या लहान बहिणीचा देखील विनयभंग केला असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे . इतवारा पोलिस ठाण्यात ह्या मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण वाढू नये म्हणून तक्रारदार महिलेवर दबाव आणण्यात येत होता . तिने तक्रार देऊ नये म्हणून अडथळा आणल्या प्रकरणी माजलगाव येथील पाच जणांना नांदेड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे . पीडितेचे आई – वडील सुरूवातीला माजलगाव शहर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतु माजलगाव येथील पाच जणांनी या प्रकरणात मध्यस्थी करून तक्रार न देण्यासाठी धमकावले. मग पीडित मुलीच्या आईवडिलांनी नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

माजलगावच्या काही लोकांनी मौलाना फारुखीला माजलगाव ला बोलावून फ्रीस्टाईल चोप दिला, मात्र त्यांच्या तावडीतून हा मौलाना निसटून फरार झाला. पोलिसांनी माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवाब पटेल, एमआयएमचा तालुकाध्यक्ष शेख इद्रिस पाशा, अस्लम मंजूर मिर्झा, शेख तकी, शेख रफी रा. भाटवडगांव या पाच जणांना माजलगाव पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन नांदेडला नेले आहे.

खून करून त्याचे शूटिंग करणाऱ्या लव्ह जिहादच्या ‘ ह्या ‘ केसमध्ये अचानक वेगळी माहिती समोर ?

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा

7 thoughts on “अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

  1. Pingback: धर्माची बंधने झुगारून महासत्ता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या चीनचा नक्की धर्म कोणता ? – Marathi People

  2. Pingback: अखेर पुण्यातली लेडी डॉन आरती मिसाळ धरली : ‘ ह्या ‘ धंद्याने झाली होती कोट्याधीश – Marathi People

  3. Pingback: लष्करप्रमुख बिपीन रावत यांना शिवसेनेचे जोरदार समर्थन : सामनामधून अभिनंदन – Marathi People

  4. Pingback: पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळून पतीची आत्महत्या : सुसाईड नोटमध्ये लिहले असे काही ?

  5. Pingback: अल्पवयीन मुलीचे गोड बोलून अपहरण आणि अत्याचार : पोलिसांनी अक्षरश: सिनेस्टाइल धरले आरोपी – Marathi People

  6. Pingback: दोन्ही भावांनी बायकांना परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले : नकार देताच मिळाला तलाक – Marath

  7. Pingback: IPS अधिकारी हिमांशू रॉय यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या : काय आहे कारण ? – Marathi People

Leave a Reply