संस्कृत हीच बोली भाषा असलेल्या भारतातील ‘ ह्या ‘ गावाची कथा

By | October 10, 2017

mattur village karnataka

संस्कृत हि जगातील सगळ्यात पुरातन आणि सर्व भाषेची आई मानली जाते . जगातील बहुतांश भाषेंचा जन्म संस्कृत पासूनच झालेला आहे . .. पण आज आपण इंग्रजी भाषेच्या आहारी जात आपली स्वतः ची भाषा विसरत चाललो आहोत.

प्रत्येकाने आपली भाषा जपली पाहिजे आणि त्यासाठी प्रतिकाने त्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तरच भाषा टिकेल आणि वाढेल.. असो .. अजूनही भारतात एक गाव असे आहे कि जिथं संस्कृत मध्ये बोललं जात .. ही ओळखच ह्या गावाला खूप मोठी आहे .. ह्या गावाचं नाव आहे मत्तुर आणि हे कर्नाटक मध्ये आहे . कर्नाटकातल्या या खेड्यात संस्कृत भाषेला जपण्यासाठी बोली भाषा म्हणून फक्त आणि फक्त संस्कृत भाषेचा वापर केला जातो .

मत्तुर हे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील एक छोटेसे खेडेगाव आहे .मात्र संस्कृत बोलतात म्हणून येथे सर्व पुरातन लोक असतील असा विचारसुद्धा मनात आणू नका . ह्या गावातील सर्वजण उच्च शिक्षित आहेत आणि इतर भाषांमध्ये देखील प्रगत आहेत., कदाचित आपल्यापेक्षाही.. या गावात जर तुम्हाला जगायचं असेल आणि व्यवहार करायचे असतील तर संस्कृत येणे अनिवार्य आहे कारण इथे व्यवहारासाठी आणि बोलण्यासाठी दुसरी कोणती भाषा वापरली जात नाही .

१९८१ मध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ( अशी संस्था जी भारतीय भाषांची ओळख जपण्याचा प्रयत्न करते ) मत्तुर मध्ये एक ८ दिवसांचे संस्कृत चे प्रशिक्षण केंद्र सुरु केले आणि लोकांना संस्कृत चे महत्व सांगून दिले .मग काय, गाव करी ते राव न करी .. इथल्या लोकांनी हळू हळू संस्कृत वापरायला सुरु केले आणि आज इथला प्रत्येक व्यवहार हा संस्कृत मधेच होतो.. आणि आता ह्या गावाची हीच ओळख गावाला जागतिक पातळीवर घेऊन गेली .

मत्तुर गाव देखील एक आदर्श गाव वाटावे असेच आहे . या गावाचा आकार चौकोनी आहे . गावाच्या मध्यभागी मंदिर आहे त्याच्या बाजूला पाठशाळा आणि त्यानंतर पूर्ण गाव . रोज मंदिरात रोज वेदपठण सुरु झाले कि त्याचा मधुर आवाज पूर्ण गावात घुमतो आणि आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो .

या शाळेतील विद्यार्थी देखील संस्कृत भाषेवर व वेद पुराणावर प्रेम करणारे आहेत . मूळ संस्कृतमध्ये असलेल्या व जुन्या जीर्ण होत चाललेले पुराणांचे रूपांतर कॉम्प्युटरच्या भाषेत करतात जेणेकरून पूर्ण जगाला एका क्लिक वरून संस्कृत भाषा वाचता शिकता येते. संस्कृत शिकावी म्हणून येथे परदेशातूनही काही व्यक्ती येत असतात.

वेद कालीन युग आणि २१ व्या शतकातील जग असा दुहेरी संगम आपल्याला इथं अनुभवता येतो . नदीच्या किनाऱ्यावर बसून ध्यान करताना बसलेली तरुण मुले थोड्या वेळाने कॉम्प्युटरवर बसून जगाशी संवाद साधताना दिसतील .मत्तुर गावाची आणखी एक खासियत म्हणजे प्रत्येक घरामधील कमीत कमी एक व्यक्ती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, परदेशातून शिक्षण घेऊन आलेला आहे आणि कर्नाटकातल्या महत्वाच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून काम करतात.

? पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा .. शेअर करा ?