प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

By | January 14, 2018

wife kills her husband for boyfriend do plastic surgery of boyfriend

प्रियकराच्या मदतीने पतीचा अक्षरश: मुंडके धडावेगळे करून खुन करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे . पत्नी गुलशबा हिने 22 वर्षीय प्रियकराच्या साथीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळं करून खून केल्याची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी भिवंडीतील नागाव इथे घडली होती. घटना घडल्यापासून सदर महिला व तिचा प्रियकर असलेला रिजवान हे फरार होते .

मृत पतीचे नाव हे मूळ मनोजकुमार सोनी असून गुलशबा हिच्याशी विवाह कारण्यासाठी त्याने धर्मांतर केले होते . धर्मांतर झाल्यानंतर त्याने आपले नाव कैफ असे केले आणि गुलशबा सोबत विवाह केला . मृत मनोजकुमार हा गुलशबा आणि 3 मुलांसोबत नागाव परिसरातील विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होता. तो आग्रा येथे कटलरी सामान विक्रीचे काम करीत असल्याने दीड ते 2 महिन्यांनी घरी येत असे.दरम्यान त्याच्या गुलशबा हिचे परिसरात राहणाऱ्या रिजवान याच्याशी सूत जुळले आणि त्यांच्यात अवैध शारीरिक संबध देखील सुरु झाले.पती नसताना यांच्यामध्ये राजरोसपणे ह्या सर्व गोष्टी सुरु होत्या. शेजाऱ्यांना देखील याची माहिती होती मात्र कोणी काही बोलत नव्हते.

3 जानेवारी रोजी पती घरी आपल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला रिजवानसोबत अश्लील चाळे करताना पाहिलं.त्यावरून त्यांच्यात भांडणाला सुरवात झाली आणि आता आपले आपले काही खरे नाही असे लक्षात आल्यावर गुलशबा व तिचा प्रियकर रिजवान यांनी धारदार शस्त्राने डोके धडावेगळे करून मृतदेह घरातच टाकून फरार झाले. परिसरातील नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवून पोलिसांना बोलवले, पोलीस आले त्यावेळी पतीचे शीर धडावेगळे केलेलं होते आणि तयावर ब्लॅंकेट टाकण्यात आलेले होते, आणि गुलशबा व रिजवान फरार झालेले होते.

दरम्यान पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शांतीनगर पोलिसांच्या दोन पथकांनी उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील एका गावातून पत्नी गुलशबा आणि रिजवान यांना सापळा रचून ताब्यात घेतले. दोघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली असून शांतीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यातील कोंढवा परिसरात २३ वर्षीय तरुणीवर दारू पाजून सामूहिक बलात्कार

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

नाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा