पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा : मोर्चेबांधणीस झाली सुरुवात

By | July 8, 2018

maratha-morcha-meeting in mumbai

मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई विभागातर्फे दादरच्या शिवाजी मंदिर येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील कार्यालयात १३ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या तयारीबाबत मोर्चेबांधणी करण्यात आली.महामुंबई विभागाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर मुंबईत ही पहिलीच सभा झाली. सभेला प्रचंड संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. मराठा क्रांती मोर्चाद्वारे मांडलेल्या विविध मागण्यांची सद्य:स्थिती व मुंबईत होणाºया राज्य मागासवर्ग आयोगाच्या जनसुनावणीबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील बांधकाम भवनमध्ये १३ जुलैला ही जनसुनावणी पार पडणार आहे. जनसुनावणीत आयोगास सादर करायच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामुदायिक व इतर प्रकारच्या निवेदनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधित गोष्टींचा प्रचार, प्रसार कसा करता येईल? व सदरची निवेदने विविध घटकांकडून कशा प्रकारे जमा करायची? याविषयीची आखणीही बैठकीत करण्यात आली.

कोपर्डी घटनेला १३ जुलै रोजी २ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने लाखो निवेदने जमा करून पुढील पिढीच्या भविष्याची तरतूद करून खºया अर्थाने कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.’राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने’विषयी मराठा बांधवांच्या शंकांचेही या वेळी निरसन करण्यात आले. शुल्क सवलतीविषयी उद्भवणाºया अनेक समस्या सोडविण्यासाठी उपस्थितांमधून एका टीमचे गठन करण्यात आले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व त्याच्या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मदत केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई शहरात शिवडी, तर उपनगरात जोगेश्वरी या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी दोन समाजबांधवांनी वैयक्तिक जागा देण्याचे जाहीर केले. रविवारी या मदत केंद्रांचे उद्घाटन होणार आहे.

तसेच मुंबई शहर व लगतच्या भागांतून माथाडी, डबेवाले, घरकाम, बिगारी कामगार व तत्सम अकुशल, असंघटित वर्गांमधील मराठ्यांकडून निवेदने गोळा करणे तसेच समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या जी पिछेहाट झाली आहे, अशा दयनीय अवस्थेतून वेळीच बाहेर काढण्याच्या मदतीविषयी निवेदनातून विनवणी करणे.