‘ ह्या ‘ मनसे कार्यकर्त्याचे वेळीच ऐकले असते तर मुंबई आग टाळता आली असती

By | December 29, 2017

manse workers finally catches feriwala who attacked sushant malwade

लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीमध्ये हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झालं. मात्र तब्बल १५ नागरिकांना देखील आपले प्राण यात गमवावे लागले. ह्या बिल्डिंगमध्ये आग लागू नये मम्हणून असलेल्या नियमाचे पालन केले जात नाही, त्यावर कारवाई करावी अशी तक्रार स्थानिक मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केलं, यातून मुंबई महापालिकेचा ढिसाळ व भ्रष्ट कारभार समोर येतो आहे.

लोअर परेल परिसरात राहणारे स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केलेल्या तक्रारीची मुंबई महापालिकेने वेळीच दखल घेतली असती तर आज अनेकांचे जीव वाचले असते, असे आता नागरिक म्हणू लागले आहेत. कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये घडलेल्या अग्नितांडवात १५ जणांचा बळी गेला.

मंगेश कशाळकर याच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती. कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामे व इथे अग्नी सुरक्षेच्या नियमाचे पालन होत नाही अशी तक्रार मंगेश कशाळकर यांनी महापालिकेकडे याविरोधात रीतसर तक्रार नोंदवली होती. मात्र महापालिकेने यावर कोणतीही कारवाई केली नाहीच उलट मंगेश कशाळकर यांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मंगेश कशाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मग महापालिकेचे उत्तर आले, त्यात कमला मिल कंपाऊंडमध्ये कुठेही अनधिकृत गोष्टी नाहीत असे उत्तर देण्यात आले होते.

मुंबईमध्ये प्रत्येक महिन्याला सुमारे १० ते १५ ठिकाणी आग लागण्याची नोंद होते. मात्र तरी देखील महापालिकेकडून कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही. ह्या वाढत्या आगीचे कारणे शोधणे हे देखील एक आव्हानच आहे. याआधी देखील साकीनाका परिसरात भानू फरसाण ला लागलेल्या आगीत १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीदेखील कुठल्याही उपाय योजना केल्या जात नाहीत. त्यानंतर आज लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरत गेली. आतापर्यंत आगीत गुदमरून तब्बल 15 जण आपल्या प्राणास मुकले आहेत.

देवा विरुद्ध टायगर जिंदा है मुद्दा पेटला : मनसेची खास भाषेत धमकी

वारीस पठाण मूर्ख माणूस .. लॉटरी लागून आमदार झालाय : मनसेचा पलटवार

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?