मनसे कार्यकते भडकले .. सेनाभवनासमोर लावले हे ‘ वादग्रस्त ‘ पोस्टर

By | October 15, 2017

manse poster in front of shivsena bhavan

मुंबई मध्ये ६ नगरसेवक पळवल्यामुळे मनसेचा तिळपापड झाला असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतापलेल्या मनसेकडून मुंबईच्या दादर परिसरात पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्ला करण्यात आला आहे. मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांना मनसेकडून छक्क्यांची उपमा देण्यात आली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’असं लिहिलेलं पोस्टर येथे लावण्यात आलं आहे.

शनिवारी अस्वस्थ मनसे कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर गर्दी करीत, शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. भाजपा सत्तेच्या जवळ जात असल्याचे चित्र असताना, शिवसेनेने अचानक खेळी करत ६ नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. भाजपाला धक्का देण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे मनसेची उरलीसुरली ताकत देखील संपुष्टात आली. त्यामुळे शिवसेना-मनसेत वितुष्ट निर्माण झाले आहे. पालिकेत मनसेचा केवळ एकच नगरसेवक उरला उरल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. .त्या फुटलेल्या सहा नगरसेवकांच्या घराभोवती तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

शेवटी हा राग व्यक्त करण्यासाठी शनिवारी राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानाबाहेर शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे या नगरसेवकांच्या घरांना आणि तसेच याच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. .

मात्र, मनसे कार्यकर्ते खवळल्यामुळे शिवसेनेत गेलेल्या या सहा नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या नगरसेवकांना दगाफटका होऊ नये, यासाठी त्यांना अज्ञात स्थळी हलविण्यात आल्याची चर्चा दिवसभर रंगत आहे . मात्र, हे नगरसेवक त्यांच्याच प्रभागात मतदारांना दिवाळीनिमित्त उटणे वाटताना दिसल्याचीही बातमी आहे .

आधीच अस्तित्वासाठी लढणाऱ्या मनसेसाठी हा घाव एकदम खराब वेळेत आपल्याच रक्ताच्या नात्यातून आल्यामुळे मनसे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत . आता पुढे पक्ष वाढवण्याचे आव्हान मनसे कसे पेलणार हे बघणे महत्वाचे आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?